करमाळा प्रतिनिधी बेवारस मृतदेहांवर स्वखर्चाने अंत्यसंस्कार करणारे सामाजिक कार्यकर्ते नासीर कबीर व मिलनशेठ जपे यांचा सत्कार करमाळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पत्रकार अशोक नरसाळे नागेश शेंडगे निलेश चव्हाण मारुती भोसले हिवरवाडी चे सरपंच राजेंद्र मिरगळ पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश कुटे उपस्थित होते नुकतेच करमाळा एमआयडीसीमध्ये एका परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला होता गेली आठ दिवसापासून तो आजारी होता त्याला रुग्णालयात दाखल करण्याचे काम देवळाली ग्रामपंचायतीचे सदस्य राहुल कानगुडे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केले होते त्यावरील औषधोपचाराचा खर्च कानगुडे यांनी केला होता दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला यावेळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करायचे कोणी हा प्रश्न निर्माण झाला होता यावेळी सामाजिक कार्यकर्ते नासिर कबीर पुढाकार घेऊन मिलन सेट जपटे जगदीश अग्रवाल यांना बरोबर घेऊन अंत्यसंस्काराची तयारी करून नियोजन केले मयत मजुराचे कोणी नातलग नसल्यामुळे जवळपास 48 तास हा मृतदेह कुटीर रुग्णालयात असाच होता ही गोष्ट लक्षात आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते नासिर कबीर यांनी पुढील सोपस्कार पार पाडले यापूर्वीही करमाळा एमायडिसी मध्ये एका उद्योजकाच्या नातलगांनी आत्महत्या केल्यानंतर त्याचाही अंत्यसंस्काराचा कार्यभाग कबीर यांनी उरकला होता यावेळी बोलताना नासीर कबीर म्हणाले की अंत्यसंस्कारासाठी एक रथ बनविण्याचा मानस असून लवकरच सामाजिक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन असा अत्याधुनिक रथ बनवून नगरपालिकेकडे सुपूर्त करण्यात असल्याचा मनोदय व्यक्त केला.
करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…
करमाळा प्रतिनिधी भाजप पक्षाच्या कार्यक्रमा निमीत्त करमाळा दौऱ्यावर आले असता मा . आ . जयवंतराव…
* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…