Categories: Uncategorized

सोगाव येथील कोरोनाने पालक गमावलेल्या बालकांना जगदीशब्द फाउंडेशनचा आधार; घेतले शैक्षणिक पालकत्व

 

करमाळा प्रतिनिधी  पुणे येथील जगदीशब्द फाउंडेशनचे संस्थापक व्याख्याते जगदीश ओहोळ यांनी करमाळा तालुक्यातील सोगाव(प) या गावातील नऊ बालकांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारत त्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शालेय साहित्याचे वाटप केले व त्यांना शैक्षणिक दत्तक घेतले आहे.या शैक्षणिक साहित्याचे वाटप सोगाव ग्रामपंचायत येथे करण्यात आले. यावेळी सरपंच पुष्पलात गोडगे, सरपंच प्रतिनिधी स्वप्नील गोडगे, जगदिशब्द फाउंडेशनचे संस्थापक व व्याख्याते जगदीश ओहोळ, ग्रामपंचायत सदस्य भगवान निवृत्ती बरडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश गोडगे, चंद्रकांत गोसावी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, मनोज घनवट, तुळशीदास सरडे, जितेश कदम, तुळशीदास गोडगे, जुनी पेन्शन संघटनेचे सोलापूर जिल्हा संस्थापक अध्यक्ष नवनाथ धांडोरे, वांगीचे उपसरपंच ज्ञानेश्वर ढावरे आदी जण यावेळी उपस्थित होते.

ज्या विद्यार्थ्यांच्या आई, वडिलांचा कोरोना काळात मृत्यू झाला, अशी बालके शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाऊ नयेत, शालाबाह्य होऊ नयेत. त्यांना अशा वाईट काळात आर्थिक हातभार द्यावा व मानसिक बळ द्यावे या उदात्त हेतूने जगदिशब्द फाउंडेशन ने अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे.

आज सोगाव(प) येथील शैला(६ वी) , भक्ती(५ वी), गौरी(३ री), योगिता(१ ली), अंजली(१० वैशाली(८ वी), सोमनाथ(४ थी), कृष्णा(२ री), ज्ञानेश्वर(अंगणवाडी) फाउंडेशन च्या वतीने यांना दर्जेदार शैक्षणिक साहित्य देण्यात आले आहे. पुढील काळात ही या विद्यार्थ्यांना फाउंडेशन कडून वेळोवेळी शैक्षणिक मदत केली जाईल असे जगदीश ओहोळ यांनी सांगितले.सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूदर सर्वाधिक असणारे गाव म्हणजे करमाळा तालुक्यातील सोगाव हे गाव आहे. म्हणून या गावात एक सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, आई, वडील हरवलेल्या पाल्यांना ऊर्जा मिळावी, ते शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात राहावेत या हेतूनेही आम्ही सोगाव येथील या पाल्यांना आम्ही आधार देत आहोत.

चौकट –
व्याख्यानांसाठी राज्यभर फिरत असताना मनात विचार येतो की, महामानवांचे व इतर आपण जे विचार जगासमोर मांडतो त्या सर्व विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड देणे गरजेचे आहे आणि ती प्रत्यक्ष कृती करण्यासाठी आम्ही ‘जगदिशब्द फाउंडेशन’ ची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून शिक्षण हे आमच्या कार्याचे मुख्य क्षेत्र असणार आहे. गावगाड्यातील गरजू, कष्टकरी, उपेक्षित, वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही हे उपक्रम राबवित आहोत. भविष्यात हे कार्य राज्यभर करू!

– जगदीश ओहोळ
(व्याख्याते व संस्थापक जगदीशब्द फाउंडेशन)

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

15 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

18 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

20 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago