Categories: Uncategorized

औषधनिर्माणशास्ञ पदविका व पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम तारीख एकच असावी -प्रा.रामदास झोळ*

 

करमाळा प्रतिनिधी-
औषधनिर्माणशास्ञ पदविका व पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम तारीख एकच असावी व पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अजुन एक फेरी घेण्यात यावी अशा मागणीचे निवेदन उच्च व तंत्रशिक्षण मंंञी उदयजी सामंत यांना दिले आहे अशी माहिती असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट ऑफ अन्एडेड इन्स्टिट्यूटस इन रुरल एरिया संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ सर यांनी दिली आहे.तसेच शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जवळपास ७५,००० अर्ज प्राप्त झालेले आहेत परंतु दुसऱ्या फेरीच्या अखेरीस असे लक्षात येते कि, महाविद्यालयाच्या एकुण प्रवेश क्षमतेच्या जवळपास ३०-३५% प्रवेशाच्या जागा रिक्त राहत आहेत व बरेचसे विद्यार्थी हे पदवी औषधनिर्माणशास्त्र ह्या प्रवेशासाठी उत्सुक असतात पण पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अगोदर चालु झाल्याने ह्याच विद्यार्थ्यांना पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला आहे व ज्यावेळेस पदवी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेश फेर्या चालु होतील तेव्हा ते विद्यार्थी पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाचे प्रवेश रद्द करतील,त्यामुळे महाविद्यालयाच्या ५०% पेक्षा जास्त प्रवेशाच्या जागा रिक्त होतील आणी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ७५,००० अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रतिक्षेत आहेत, त्यामुळे पदविका व पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम तारीख एकच असावी व राज्यामध्ये पदविका अभ्यासक्रमासाठी आणखी एक प्रवेश फेरी घ्यावी अशी मागणी असोसिएशन मार्फत करण्यात आली आहे असे प्रा.झोळ सर यांनी सांगितले.तसेच या मागणीबाबत मंत्री महोदयांनी डिप्लोमा फार्मसीसाठी आणखी एक प्रवेश फेरी घेण्याबाबत व डिग्री व डिप्लोमा अभ्यासक्रमाची प्रवेशाची अंतिम तारीख एक करणेबाबत अश्वासीत केले आहे,सदरचे निवेदन देताना प्रा.रामदास झोळ यांच्या समवेत अलान्ना काॅलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य जगताप सर फलटण फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.मनोज फडतरे सर, जेएसपीएमचे प्राचार्य डॉ.प्रफुल्ल आडकर, डी.वाय.पाटिल काॅलेजचे प्राचार्य डॉ.जंगमे सर आदी मान्यवर उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभिव्यक्तीला जिल्हास्तरीय व्यासपीठ* *लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धा

करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…

12 hours ago

मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी मंडळाच्या शिबीरात १६६ जणांचे रक्तदान*

करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…

1 day ago

जयकुमार गोरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा करमाळ्यात भाजपकडून तीव्र निषेध

  करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…

2 days ago

नाशवंत गोष्टीकडे दुर्लक्ष करून शाश्वत गोष्टी लक्षात घेवून युवकांनी समाजकारण व राजकारणातून जनतेची सेवा करावी . – मा .आ जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…

2 days ago

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त करमाळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

  करमाळा प्रतिनिधी : मुक्ता साळवे शैक्षणिक अभियान, करमाळा यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…

2 days ago

शासकीय कामकाजाचे प्रत्यक्ष धडे! ‘नामसाधना’च्या चिमुकल्यांनी स्वतः अर्ज लिहून मांडल्या समस्या; मुख्याधिकाऱ्यांकडून कौतुक

करमाळा (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना लहानपणापासूनच दैनंदिन जीवन, प्रशासकीय कामकाज, शासकीय…

4 days ago