चिखलठाणचे सरपंच चंद्रकांत काका सरडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकास कामांचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते उद्घघाटन

करमाळा प्रतिनिधी: चिखलठाण ग्रामपंचायतचे सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत काका सरडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता विविध विकास कामांचे उद्घघाटन व लोकार्पण सोहळा तसेच कोवीड योद्धांचा सन्मान सोहळा करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती चिखलठाणचे सरपंच चंद्रकांत सरडे यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार जयवंतराव जगताप आहेत . यावेळी बारामती ॲग्रो चे सुभाष गुळवे , जिल्हा परिषद सदस्य निळकंठ देशमुख ,आदिनाथ साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी झोळ, माजी चेअरमन वामनराव बदे , सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक राजेंद्रसिंह राजेभोसले , मकाई चे माजी चेअरमन आप्पासाहेब झांजुर्णे , अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी , नगरसेवक अतुल फंड , महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे , माजी पंचायत समिती सदस्य विलास पाटील ,संचालक पोपट सरडे , पंचायत समिती सदस्य दत्ता जाधव साडे ,सदस्य ॲड राहुल सावंत , सूर्यकांत पाटील , काँग्रेसचे सुनील बापू सावंत , भास्कर भांगे , देवळाली चे सरपंच आशिष गायकवाड ,कवीटगांवचे सरपंच शिवाजी सरडे , मांगी चे ग्रामपंचायत सदस्य सुजित बागल, झरे सरपंच प्रशांत पाटील, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दादासाहेब लबडे, शंभूराजे बोराडे, महादेव कामठे , डॉ .गोरख गुळवे , योगेश बोराडे , राजेंद्र धांडे ,सुहास गलांडे , माजी जिल्हा परिषद सदस्य विलास राऊत ,रमेश बोराडे ,सुधीर पोळ , बोरगावचे विनय ननवरे , उमेश पात्रुडकर , सामाजिक कार्यकर्ते बालाजी गावडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी कुगांव ते चिखलठाण जेऊर प्रजिमा झिरो ते पाच किमी डांबरीकरण करणे (दोनशे पन्नास लक्ष) मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत लांडाहिरा ते मार्कड वस्ती दोन. वीस किमी डांबरीकरण करणे 175 लक्ष , जल जीवन मिशन अंतर्गत चिखलठाण नंबर 1 व 2 पाणीपुरवठा योजना भूमिपूजन 160 लक्ष , चिखलठाण नंबर 2 मारुती मंदिर सभामंडप बांधकाम करणे सहा लक्ष , आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत रस्ते खडीकरण करणे सहा लक्ष , दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत हरिजन वस्ती मातंग वस्ती पेवर ब्लॉक बसवणे 9 लक्ष ,नागरी सुविधा योजना अंतर्गत हायमास्ट दिवे बसविणे दहा लक्ष आदी विविध विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा होणार असल्याची माहिती सरपंच चंद्रकांत सरडे यांनी दिली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

17 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago