Categories: Uncategorized

नागेशदादा कांबळे बहूजनरत्न पूरस्काराने सन्मानित* *समविचारी बहूजन मित्र परिवाराने केलेल्या अभिष्टचिंतन सोहळयात केला प्रदान* !

*
करमाळा  प्रतिनिधी -बहूजन नेते मा नागेश दादा कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील समविचारी बहूजन मित्र परिवाराच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर झालेल्या जाहीर कार्यक्रमात विविध समाजातील लोकांनी एकत्र येऊन 50 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळयाचे नियोजन केले होते.
आजपर्यंतच्या सामाजिक कारकिर्दीत नागेश दादा कांबळे यांनी जो सामाजिक सलोखा राखण्याचे जे बहुमोल काम केले आहे.गोरगरिब सर्वसामान्यांसाठि उभारलेले लढे यामुळे बहुजन चळवळीचा सन्मान वाढलेला आहे.आजपर्यंत बहुजन समाजातील कला,क्रिडा, शैक्षणिक इ क्षेत्रातील गूणवंतांचा सन्मान नागेश दादा यांनी केला आहे.समाजातील चांगल्या प्रवृत्ती वाढिस लागण्याकामी बहुजन समाजातील सक्रिय कार्यकर्ते यांचा समन्वय नेहमी ते राखून असतात, तब्बल सतरा वर्षे संविधान सन्मान रॅली काढून प्रबोधनाचे काम केले आहे.
हे कार्य मनात ठेवून बहुजन मित्र परिवाराने “बहूजनरत्न”पूरस्कार ट्रॉफी व यशकल्याणी सामाजिक संस्था परिवाराच्या वतीने मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
याप्रसंगी शहर व‌ तालूक्यांमधील विविध संस्थांचे पदाधिकारी, सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी नागेशजी कांबळे यांचा सत्कार करण्यासाठी एकच गर्दी केली होती.
सत्कारादरम्यान अनेक पदाधिकारी यांनी नागेशदादा यांनी राजकीय क्षेत्रात कार्यरत होण्याची विनंती केली.
सत्काराला उत्तर देताना नागेश दादा कांबळे यांनी या पूरस्काराने कृतकृत्य झालो असून या पूरस्काराने जबाबदारी व उर्जा वाढली असल्याचे त्यांनी नमूद केले.राजकिय दृष्टया सक्रिय होण्यासंबंधी उत्तर देताना ते म्हणाले कि येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीत जवळच्या कार्यकर्त्यांना निवडून आणणार असल्याचे जाहीर केले.. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये देखील कार्यकर्ते पाठवणार असल्याचे सूतोवाच नागेश कांबळे यांनी केले.
येथील आमदारकिचे समीकरण दलित समाज ठरवणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
यापूढिल काळात अधिक सक्रिय पणे चळवळीत कार्यरत राहणार असल्याची खात्री देखील त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगराध्यक्ष ओहोळ यांनी केले.

saptahikpawanputra

Recent Posts

राहुल रसाळ आणि कपिल जाचक ही ज्ञानाची विद्यापीठे… कमलाई कृषी प्रदर्शन २०२४ चे उद्घाटन प्रसंगी डॉ. अविनाश पोळ यांचे करमाळा येथे प्रतिपादन.

करमाळा प्रतिनिधी १५ ते २० देशांतून भ्रमंती करून ज्ञानसंग्रह करणारे राहुल रसाळ आणि गेल्या ५०…

4 hours ago

महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथे वर्गमित्रांचे तब्बल 45 वर्षांनी  संमेलन एक सुखद झुळुक

माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…

1 day ago

भारताचे माजी पंतप्रधान भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्यावतीने अंगणवाडीतील चिमुकल्यांना शालेय साहित्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…

2 days ago

भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची गुरुकिल्ली -साध्वी प.पू अनुराधा दिदी शेटे पंढरपूरकर

करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…

3 days ago

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

4 days ago