नगर टेंभुर्णी हायवेवरील करमाळा येथील मौलाली माळ येथे खड्ड्यांमुळे दुचाकींचा झाला अपघात

करमाळा-प्रतिनिधी
नगर ते टेंभुर्णी हायवे हा खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. अशा प्रकारच्या मथळ्याखाली संघर्ष न्यूज सोलापूरने काही दिवसांपूर्वीच एक बातमी लावली होती. त्यापूर्वीही खड्ड्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल वारंवार विविध  वृत्तपत्राच्या पत्रकारांनी सोलापूरने बातम्या प्रसारित केल्या आहेत. परंतु प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही. त्याचीच परिणीती म्हणून आज नगर-टेंभुर्णी हायवे वरील करमाळा येथील मौलाली माळ येथे खड्ड्यांचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य निर्माण झाले आहे. व नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम येथील प्रशासनिक अधिकारी यांच्यावतीने केले गेलेले आहे. येथे पडलेल्या खड्ड्यांमध्ये माती टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या मोठमोठ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. व त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनाही धुळीमुळे श्वसनाचा त्रास होण्याचा धोका व याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही.
या सर्वांची परिणीती म्हणून या ठिकाणी पडलेले खड्डे चुकवत असताना, देवळाली येथील तीन ते चार व्यक्ती अपघात होऊन किरकोळ जखमी झालेले आहेत. या ठिकाणी पडलेले खड्डे चुकवत असताना अचानक तीन मोटार सायकली एकमेकास धडकल्या. व या धडकेमध्ये तीन ते चार व्यक्ती किरकोळ जखमी झालेली आहेत. रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. व या वाहतुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी कोणताही मोठा अपघात होण्याची शक्यता आज नाकारता येत नव्हती. परंतु मौलाली माळ येथील दुकानदार यांनी वेळेचे गांभीर्य ओळखून, त्वरित अपघात झालेल्या व्यक्तींना रस्त्याच्या बाजूला सारले. व त्यांची विचारपूस केली. त्यावेळेस सदरील व्यक्तींना किरकोळ जखमा झाल्याचे दिसून आले. परंतु या खड्ड्यांमुळे टेंभुर्णी ते नगर व त्या अर्थी करमाळा तालुक्यामध्ये मोठा अपघात, जीवित हानी अथवा आर्थिक हानी टाळता येणार नाही. हेही तितकेच खरे आहे…..

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

7 hours ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

8 hours ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

14 hours ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

1 day ago

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

1 day ago