Categories: Uncategorized

आ.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते चिखलठाण येथे 7 कोटी 48 लाख निधीच्या विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यांतील रस्त्यांचा मास्टर प्लॅन करून रस्त्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार असून आतापर्यंत करमाळा मतदारसंघातील रस्त्यासाठी नाबार्ड, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राज्य शासनाचा निधी, तसेच 25 15 व आमदार निधी यामधून 48 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून , जातेगांव टेंभुर्णी रस्ता , डिकसळचा पुल यांना येणाऱ्या मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून हे काम पुर्ण करणार असल्याचे प्रतिपादन आ. संजयमामा शिंदे यांनी केले .चिखलठाण येथे सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रकांत सरडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी 15 ऑक्टोबर रोजी विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा तसेच कोवीड योद्धांचा सन्मान सोहळा करमाळा तालुक्याचे आ.संजयमामा शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला . यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते .
कार्यक्रमाच्या प्रारंभी आ.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले .कुगांव ते चिखलठाण जेऊर प्रजिमा 0 ते 5 किमी डांबरीकरण करणे , मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत लांडाहिरा ते मारकड वस्ती रस्ता, जल जीवन मिशन अंतर्गत चिखलठाण नंबर 1 व 2 पाणीपुरवठा योजना ,चिखलठाण नंबर 2 मारुती मंदिर सभामंडप बांधकाम ,आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत रस्ते खडीकरण करणे ,दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत हरिजन वस्ती मातंग वस्ती पेवर ब्लॉक बसवणे ,नागरी सुविधा योजना अंतर्गत हायमास्ट दिवे बसविणे आदी विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला .
यावेळी सरपंच चंद्रकांत सरडे यांनी चिखलठाण ते जेऊर रस्ता लवकर व्हावा , नवीन ट्रान्सफार्मर मिळावा, व्यायामशाळा , वाड्यावस्त्यांवर भगीरथ लाईट मिळावी अशा मागण्या करत , येथून पुढे आ. संजयमामा शिंदे यांच्या पाठीशी शेवटपर्यंत राहणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रकांत सरडे, आदिनाथ साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी झोळ, महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे , माजी पंचायत समिती सदस्य विलास पाटील , दूध संघाचे संचालक राजेंद्रसिंह राजेभोसले , नगरसेवक अतुल फंड , पंचायत समिती सदस्य दत्ता जाधव , मांगी चे ग्रामपंचायत सदस्य सुजित बागल , युवा नेते उदयराज सरडे ,माजी पंचायत समिती सदस्य रोहीदास सातव , मानसिंग खंडागळे , कंदर चे सरपंच भास्कर भांगे , देवळाली चे सरपंच आशिष गायकवाड , कन्हेरगांव चे माजी उपसरपंच धनंजय मोरे , प्रविण शिंदे गुरुजी , गणेश जगताप कंदर , सतिश शेळके ,कवीटगांव चे सरपंच शिवाजी सरडे , झरे सरपंच प्रशांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते बालाजी गावडे , शंभूराजे बोराडे, संचालक पोपट सरडे , राजेंद्र केदार , सदस्य सोमनाथ कदम, महादेव डोके , महादेव कामठे , डॉ .गोरख गुळवे , योगेश बोराडे , राजेंद्र धांडे ,सुहास गलांडे , पांगरे चे उपसरपंच संजय गुटाळ , रमेश बोराडे ,सुधीर पोळ , दिपक बागल ,तात्या सरडे , अशोक तकीक , चिखलठाणचे उपसरपंच आत्माराम सरडे , ग्रामपंचायत सदस्य भागवत मारकड , श्रीकांत पोळ , रमेश जाडकर , अमोल मराळ , सोपान मारकड , आप्पासाहेब सरडे , दादासाहेब सरडे , दत्तात्रेय सावळकर , बबन सरडे , सोमनाथ राऊत, श्रीनाथ गव्हाणे , मनोहर गव्हाणे , ग्रामसेवक अनिल घाडगे आदी उपस्थित होते .यावेळी दुध संघाचे संचालक राजेंद्रसिंह राजेभोसले , कन्हेरगांवचे माजी उपसरपंच धनंजय मोरे , मांगी चे सुजित बागल , संजय गुटाळ , पंचायत समिती सदस्य राहुल सावंत , सुहास गलांडे , यांनी मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नंदकिशोर वलटे यांनी केले .

saptahikpawanputra

Recent Posts

केत्तुरला पुणे-मुंबई एक्स्प्रेसचा थांबा द्या! उपसभापती ॲड. अजिनाथ विघ्ने यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

करमाळा : प्रतिनिधी केत्तुर रेल्वे स्थानकावर पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी करमाळा…

15 hours ago

राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषदेच्या राष्ट्रीय सचिव पदी संजय मस्कर यांची निवड

    करमाळा प्रतिनिधी- राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषदेच्या राष्ट्रीय सचिव पदी साडे (ता. करमाळा, जि.…

1 day ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य केल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले देवाभाऊंचे अभिनंदन

  करमाळा प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती…

2 days ago

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई; ट्रॅक्टर चोरीची बीड-चिखलठाण टोळी जेरबंद तीन ट्रॅक्टर व ट्रॉलीसह ९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त; चार गुन्ह्यांची उकल

करमाळा (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या शेतातून उभे ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा करमाळा पोलिसांनी पर्दाफाश केला…

2 days ago

खुनशी राजकीय प्रवृत्तीमुळे दहिगाव उपसा सिंचन योजनेची वाताहत! २४ गावांपैकी १२ गावांनाही व्यवस्थित पाणी मिळाले नाही- भरत (भाऊ )आवताडे

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेची विद्यमान आमदार नारायण…

2 days ago

पुणे शिक्षक मतदार संघ कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक संघटनांचा निर्धार मुकुंद साळुंखे सर यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला वेग

करमाळा प्रतिनिधी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षक संघटना, टीडीएफ आणि भारतीय जनता…

4 days ago