राजुरी प्रतिनिधी राजुरी ग्रामपंचायतीच्या वतीने चार दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामसभेत आठवडी बाजार सुरु करण्यासाठी महत्त्वाचा ठराव सर्वानुमते सहमत करण्यात आला. त्यामुळे *सोमवार दिनांक: 25/10/2021 दुपारी 3:00 वाजता* आठवडी बाजार सुरू करण्यात येईल, या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी राजुरी व पंचक्रोशीतील लोकांनी आवश्य उपस्थित रहावे. अशी विनंती सरपंच डॉ. अमोल दुरंदे यांनी केली . ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने गावातील बाजारपेठेवर अवलंबून असते, विशेषतः आठवडे बाजारामुळे दर आठवड्याला हजारो,लाखो रुपयांची उलाढाल या बाजारात होते. तालुक्याच्या ठिकाणी तसेच मोठ्या गावात काही प्रमाणात रोजच भाजीपाला मंडई भरते.
. आठवडा बाजारात स्थानिक व्यवसायाबरोबरच अन्य ठिकाणचे छोटे – छोटे व्यावसायिक आपली दुकाने घेऊन येतात भाजीपाला, फळे, कापड,धान्य, चप्पल, कटलरीसाहित्य, शालेय साहित्य, खेळणी आदींची खरेदी विक्री होऊन सर्वांची सोय होते. छोट्या व्यवसायीकानाही दोन पैसे पदरात पडतात परंतु,गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे ग्रामीण भागातील भरणारे आठवडा बाजार बंद होते . सध्या कोरोनाची रुग्णसंख्या प्रतिबंधक लस घेतल्यामुळे घटत आहे. तरीसुद्धा शासकीय नियमानुसार ग्राहक व विक्रेते यांनी कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून बाजार येताना योग्य ती काळजी घ्यावी.
करमाळा प्रतिनिधी "वृत्तलेखन ही एक कला असून ते फक्त माहिती देणे एवढ्यापुरते मर्यादित राहिले नाही,…
करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…