शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत भाऊ आवताडे यांनी गटबाजीला कंटाळून दिला राजीनामा

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात गटबाजी असल्याने या गटबाजीला कंटाळून आपण शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला असल्याचे मत भरत भाऊ आवताडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की शिवसेना पक्षाचा कुठलाही कार्यक्रम घ्यायचा असेल तर आपल्या पक्षातील स्थानिक पदाधिकार्यांचा विरोध होत असल्यामुळे पक्षवाढीसाठी कुठल्याही प्रकारचे काम न करता आल्यामुळे करमाळा तालुक्यात शिवसैनिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. शिवसेनेचा नेता कोण हे कोणालाही सांगता येत नाही. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनाभवनमधून सोलापूर जिल्हाप्रमुख ,उपजिल्हाप्रमुख, सर्व तालुकाध्यक्ष यांना मुंबईला मिटिंगसाठी बोलवले असताना जिल्हाप्रमुखांनी करमाळयातील पदाधिकाऱ्यांनी याबाबत आम्हााला सांगितले नाही . आम्हाला विचारात घेतले नाही इंधन दरवाढीच्या विरोधात जेव्हा आंदोलन झाले त्यावेळीही सुद्धा मोठ्या प्रमाणात गटबाजी झाली पक्ष ज्याला विधानसभेची उमेदवारी देईल त्याचे काम करायचे असे असताना शिवसेनेची उमेदवारी रश्मी दिदी बागल यांना मिळाली. आम्ही पदाधिकारी उपजिल्हाप्रमुख भरत अवताडे तालुकाप्रमुख सुधाकर काका लावंड, तालुका संघटक संजय शिंदे एवढ्याच पदाधिकाऱ्यांनी विधानसभेला एकनिष्ठेने काम केले ‌इतर पदाधिकाऱ्यांनी विधानसभेला बंडखोरी करून विरोधात असणाऱ्या उमेदवाराचा प्रचार केला सध्याच्या परिस्थितीमध्ये आज तेच लोक राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यानंतर आम्हाला डावलून ‌ पक्षाचे अधिकृत पद नसतानाही स्वतः पद असल्याचे सांगून पदाधिकारी म्हणून मिरवत आहेत त्यांना पक्षाची काही देणेघेणे नाही. माझ्या शिवसेनेच्या कारकीर्दीत कोरोना महामारी च्या काळामध्ये नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन आरोग्याचा महायज्ञ म्हणून शिवजयंती सामाजिक उपक्रमाने मोठ्या प्रमाणात साजरी केली. आम्ही इमानेइतबारे काम करून सुद्धा शिवसेनेचे इतर पदाधिकारी मात्र आमच्याबरोबर निष्ठेने काम न करता विरोधात काम करत असल्यामुळे शिवसेना करमाळा तालुक्यात फक्त नावाला राहिली आहे. तालुक्यात कुठलेही प्रकारचे संघटन नाही. त्यामुळे करमाळा तालुक्यामध्ये शिवसेनेचा एकही मोठा मेळावा झाला नाही याचे मुख्य कारण गटबाजीच आहे. आपली माणसे आपल्याच माणसाची पाय वाढण्याचे काम करत आहेत. आपल्याच माणसांबरोबर माझी लढण्याची आता इच्छा नाही. नुसती पेपरबाजी करायची कार्यक्रमापुरते आपण एकत्र असल्याचे दाखवायचे हे प्रकारचे काम न करता फक्त स्वतःच्या नावासाठी वैयक्तिक फायद्यासाठी शिवसेना पक्षाचा उपयोग करीत आहेत. आपण स्वाभिमानी प्रामाणिक सच्चा शिवसैनिक असल्यामुळे करमाळा तालुक्यातील शिवसेना पक्षातील गटबाजीला कंटाळून व शिवसेना पक्षाच्या कामाला योग्य न्याय न मिळाल्याने मी स्वखुशीने राजीनामा दिलाअसल्याचे उपजिल्हाप्रमुख भरत भाऊ आवताडे यांनी सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची गुरुकिल्ली -साध्वी प.पू अनुराधा दिदी शेटे पंढरपूरकर

करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…

10 hours ago

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

1 day ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

1 day ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

2 days ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

4 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

4 days ago