Categories: Uncategorized

शेतकऱ्यांची वीज खंडित करू नका-आमदार संजयमामा शिंदे

करमाळा प्रतिनिधी   सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विज पुरवठा खंडीत न करता विज बिल भरणा करण्यास मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.
सोलापूर जिल्ह्यात मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांनी विजबिल भरणा न केल्याने विज पुरवठा खंडीत करत आहे .मागील वर्षी विज बोर्डाने दिलेल्या सवलती नुसार अनेक शेतकऱ्यांनी विज बिल भरणा केलेला आहे. तरी देखील त्या शेतकऱ्याचे चालू बिल थकीत असल्याने त्यांचा विज पुरवठा खंडीत करत आहेत. वास्तविक पाहता चालू वर्षाचे थकीत विज बिल भरणे बाबत, रितसर प्रसिध्दी देणे आवश्यक असताना , अशी कोणतीही प्रसिध्दी न देता शेतकर्यांचे अचानक विज पुरवठा खंडीत करत आहेत. ही बाब शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे.सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी यांसाठी लाईट बिल भरणेबाबत रितसर प्रसिध्दी देऊन मार्च अखेर विज बिल भरणेस मुदतवाढ देण्यात यावी. तो प्रर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांची लाईट खंडीत करण्यात येवू नये अशी मागणी आमदार संजयमामा शिंदे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचेकडे केली आहे .

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago