करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात नव्याने डायलिसिस सेंटर मंजूर झाले असून त्याचा फायदा तालुक्यातील गोरगरीब जनतेने घ्यावा असे आवाहन आमदार संजय मामा शिंदे यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की यापूर्वी तालुक्यातील रुग्णांना डायलिसिस साठी नगर ,सोलापूर ,अकलूज, बार्शी आदी ठिकाणी जावे लागत होते .याकामी लोकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत होता. वाहतूक खर्च व वेळही वाया जात होता. त्यामुळे आपण राज्याचे आरोग्य मंत्री नामदार राजेशजी टोपे यांचे कडे पाठपुरावा केला.
करमाळा येथे 2 मशीन मिळणार आहेत व त्यासाठी आवश्यक असणारा RO प्लँट व इतर आवश्यक बाबीची पूर्तता केली जाणार असून लवकरच डायलिसिस सेंटर कार्यन्वित होईल .या सेंटर मुळे सर्पदंशाने किडनी विकार उद्भवलेले, किडनी विकाराने त्रस्त असलेल्या रुग्णाला दिलासा मिळणार आहे. करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयाला यापूर्वीच आमदार संजय मामा शिंदे यांच्या प्रयत्नातून मोफत सिजरियन सुविधा, डिजिटल एक्स-रे मशीन , 30 बेडची सेंट्रल ऑक्सीजन लाईन ,ऑक्सीजन प्लांट, 50 कॉटचे श्रेणी वर्धन करून 100 कॉट मध्ये रूपांतर आदी सुविधा यापूर्वी झालेल्या आहेत. आता डायलिसिस सेंटर सुरू होणार असल्यामुळे याचा फायदा तालुक्यातील जनतेला होणार आहे.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…