यशकल्याणी सेवाभावी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून करमाळा तालुक्यामध्ये समाजसेवा करून आपल्या नावाचा ठसा संपूर्ण महाराष्ट्रात उमटवणारे गणेश भाऊ करे पाटील यांचा जन्म विहाळ येथे सात सप्टेंबर 19 88 रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला घरची परिस्थिती बेताची असल्याने पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण पिंपरी चिंचवड येथील प्राथमिक व नव महाराष्ट्र विद्यालय झाले तर अकरावी ते बारावी शिक्षण महाराष्ट्र महाविद्यालयात केल्यानंतर एफवाय ते बीएससी शिक्षण महात्मा फुले विद्यालयामध्ये झाले घरची आर्थिक परिस्थिती शिक्षण घेण्यासारखी नसल्यामुळे पेपर टाकून दुधाच्या पिशव्या टाकण्यापासून बगीच्या माळी कामापर्यंत त्यांनी कामे केली. त्यानंतर प्लंबिंग कामात प्लंबर च्या हाताखाली काम करून व नंतर प्लंबिंग चे कामे स्वतः घेऊन शिक्षण पूर्ण केले पूर्ण केले त्यांना वकृत्व कलेची आवड असल्याने दहावी-बारावीनंतर स्वतः वक्तृत्व कला विकसित करून महाविद्यालय शिक्षण झाल्यावर शिवजयंती नवरात्र महोत्सव पिंपरीचिंचवड व्याख्यानमाला भक्ती शक्ती याबरोबरच विषयावर व्याख्याने देऊन मिळालेल्या मानधनातुन चाळीत राहणाऱ्या गणेश भाऊंनी आपल्या वकृत्व कलेच्या जोरावर चक्क काळेवाडी येथे पंधरा लाख रुपयाचा फ्लॅट खरेदी केला गणेश भाऊंनी एम एस्सी पुर्ण केल्यानंतर नोकरीवर लक्ष्य केंद्रित केले त्यांनी काही काळ कंपनीमध्ये नंतर कोचिंग क्लास मध्ये प्राध्यापक म्हणून काम केले रयत शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापकाची नोकरी लागली असताना समाजसेवेचा ध्यास घेतला असल्यामुळे समाजसेवा करण्याचा निर्धार त्यांनी केला. गणेश भाऊंचा लहान भाऊ जयंत हा दिवेकर साहेबाकडे असल्याने गणेश भाऊ सुट्टीच्या जोशी जयंत देवकर साहेबाकडे जाऊ लागले गणेशभाऊची हुशारी बघून जयंत दिवेकर त्यांच्या भगिनी लीलाताई दिवेकर विमलताई दिवेकर अशोक दिवेकर यांच्याशी त्यांचा संपर्क आल्याने दिवेकर साहेब यांना गणेश भाऊचा विश्वास पटल्यामुळे व त्यांची काम करण्याची तडफ पाहून आपल्या आई वडिलांच्या नावे यशवंत दिवेकर कल्याणी दिवेकर या नावातून यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था काढण्याचे ठरवले ती संस्था 21 मार्च 2014 साली स्थापन झाली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून गणेश भाऊ करे पाटील यांची एकमताने निवड झाली. दिवेकर साहेब व त्यांच्या परिवाराने संस्थेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून लाखो रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत या सर्व रकमाच्या व्याजावर संस्थेचे कामकाज चालत आहे लीलाताई दिवेकर यांच्या प्रेरणेतून लहान मुलांचा विकास झाल्याशिवाय भविष्यात चांगली घडू शकत नाही यासाठी लहान मुलांचे विकासासाठी 1 एप्रिल 2014 ला कावळवाडी येथे लहान मुलांसाठी साडेचार हजार स्केअरफुटची इमारत बांधली आहे यामध्ये नऊ खोल्या असून बालविकासाचे सर्व कार्यक्रम राबवण्यात आले आहेत. यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जनसामान्यांची सेवा करत असताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला वाव देण्याबरोबर ग्रामीण भागातील मुलांना खेळाचे चांगले साहित्य उपलब्ध व्हावे याकरिता करमाळ्यातील जिल्हा परिषद शाळा यांना 80 लाख रूपयांची व नगर जिल्ह्यात 65लाखाची खेळणीचे वाटप केले आहे. यामध्ये करमाळा तालुक्यातील पोमलवाडी शाळेस संगणक मूकबधिर शाळेतील मुलांना खेळणी व गणवेशाचे वाटप केले आहे आपला स्वतःचा वाढदिवस मोठा डामडौल न करता चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणारा वाढदिवस त्यांनी साजरा केला आहे ग्रामीण विकासाबरोबरच शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शाळेसाठी सुसज्ज ग्रंथालय खेळणी संगणक संच क्रीडा साहित्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यावर त्यांनी भर दिला आहे त्यांनी केलेली विकास कामामुळे त्यांना दहा विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ व सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करून गौरव केलेला आहे. सामाजिक कामाची जाणीव ठेवत सर्वांगीण विकासाचे काम करण्याची उमेद बघून गावकऱ्यांनी कावळवाडी गावचा सरपंच सरपंच निवडणूक लढवण्याचा आग्रह केल्यामुळे त्यांनी निवडणूक लढवली यामध्ये जनतेतून बहुमताने निवडून आले कावळवाडी गाव आदर्श गाव करण्याचा संकल्प करून दीडशे युवकांना हिवरेबाजारचा अभ्यास दौरा करून आपले गाव आदर्श करण्याचा कार्यक्रम हाती घेतला त्याकरिता गावातील रस्त्याचे काम सामूहिक श्रमदानाने केले.त्याकरिता सकाळ समूहाच्या पुढाकाराने गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तलावातील गाळ काढण्याचे काम केले त्यामुळे गावात रस्ता व पाण्याचा प्रश्न सुटला असून गाव स्वयंपूर्ण झाले आहे. याचबरोबर गावच्या विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडण्यासाठी करण्यासाठी यशकल्याणी संस्थेच्या माध्यमातून सौर ग्राम करण्यासाठी राष्ट्रीय कंपनीकडून निधी आणून कावळवाडी गाव सौर ग्राम केले आपल्या गावातील गरीब कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी दहा हजार रुपये देणारे एकमेव गणेश करे पाटील होते. गावातील चांगली कामे करीत असताना सर्व नेत्यांची सलोखा ठेवल्यामुळे राजकीय नेत्यांची व गावातील लोकांशी त्यांना संबंध ठेवणे अडचणीचे झाल्याने हितसंबंध दुखावल्यामुळे त्यांनी आपण राजकारणात आपण सर्वांचे समाधान करू शकत नाही ही बाब लक्षात आल्यामुळे स्वतःहून राजीनामा दिला व यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आपले कार्य चालू ठेवले आहे.त्यांच्या या समाजकार्यात या कार्यांमध्ये त्यांच्या धर्मपत्नी सौ शितलताई करे पाटील यांनी समाजकार्य प्रपंच म्हणुन आयुष्य वेचत आहे.कोरोना महामारीच्या काळातही सामाजिक विकासासाचे कार्य चालू ठेवले.गणेश भाऊ करे पाटील यांनी यशकल्याणी परिवाराचे रोपटे कावळवाडी येथुन सुरू केले.भाऊच्या कार्यपद्धतीनुसार करमाळा तालुक्यासह कर्जत जामखेड तालुक्यात विस्तार वाढला आहे.संस्थेचे विविध कार्यक्रम व्यवस्थित पार पडावे म्हणुन करमाळा येथे यशकल्याणी भवन उभारण्याचा संकल्प करून करमाळा पुणे रोड येथील बागवाननगर येथे पाच गुंठे जागा घेऊन 3 मजली इमारत बांधली असून यामध्ये यशकल्याणी प्रज्ञाशोध परिक्षा,वाद विवाद,निंबध वकृत्व,मिटींग हाॅल,स्पर्धा परिक्षा विद्याथ्र्यांना अभ्यासिका,रेस्ट रुम,व शैक्षणिक उपक्रमासाठी भवन उभारण्यात आले आहे. कोरोना काळातही भाऊनी समाजकार्याचे व्रत चालू ठेवले असुन यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे प्रेरणास्थान थोर शास्त्रज्ञ वसंतराव दिवेकर यांच्या व्दित्तीय स्मरणाच्या निमित्ताने यशकल्याणी संस्थेने वसंतमहोत्सवाचे आयोजन केले होते. यामध्ये यशकल्याणी संस्थेच्या वसंत महोत्सवात वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट पाडून त्यांच्या या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी विक्रमी म्हणजे जवळपास ४ हजार २६८ विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता त्याचे बक्षीस वितरण करण्यात आले असून यशकल्याणी सामाजिक संस्थेचा वसंत महोत्सव विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रेरणादायी असुन पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणेसाहेब सामाजिक कार्याचे कौतुक केले.
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…