भरतभाऊ आवताडे यांना योग्य संधी देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करु-आमदार संजयमामा शिंदे* 

करमाळा प्रतिनिधी                                          फिसरे गावाचा सर्वांगीण विकास व्हावा हे ध्येय ठेवून शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देऊन भरत (भाऊ) आवताडे यांनी प्रवेश केला असून भविष्यात त्यांना चांगली संधी देऊन त्यांच्या कार्याचा नक्की सन्मान करु असे मत करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी फिसरे येथील जाहीर प्रवेश कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.करमाळा तालुक्यामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये आपण केवळ विकास हाच दृष्टिकोन ठेवून काम केले असून रस्ते, पाणी, वीज, आरोग्य या सर्व प्रश्नांना प्राधान्य देऊन काम केले आहे. दहिगावचे पाणी मिळवून देण्याच्या कामी पाठपुरावा केल्यामुळे करमाळा तालुक्यातील दहिगावचे पाणी योग्य प्रमाणात मिळाल्यामुळे तालुक्यात सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे. करमाळा तालुका सुजलाम सुफलाम झाला पाहिजे ही आपली भावना असून 2024 सालापर्यंत करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास करून विकास कामाच्या जोरावर आशीर्वादरुपी मत मागणार आहे. कोरोना काळात नागरिकांना आरोग्य सुविधा मिळवुन देण्यासाठी काम केले असून कोरोना लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविली असल्यामुळे कोरोनापासुन नागरिक सुरक्षित राहण्यास मदत झाली आहे. औद्योगिकदृष्ट्या करमाळा तालुका संपन्न होण्यासाठी एम.आय. डी.सी.चा प्रश्न मार्गी लावुन उद्योग व्यवसाय वाढीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. भरत (भाऊ) आवताडे यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या मुद्द्यावर फिसरे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रदीप दौंडे, उपसरपंच संदीप नेटके, सदस्य विजय आवताडे, हनुमंत रोकडे, गणेश ढावरे यांच्यासह सर्व सदस्यानी संजय(मामा) शिंदे गटात प्रवेश केला. या कार्यक्रमास उध्दवदादा माळी, राजेंद्रसिंह राजेभोसले, विलासदादा पाटील,तानाजी झोळ, चिखलठाणचे सरपंच चंद्रकांत काका सरडे, महादेव आवताडे, योगी हरीओम बाबा सन्यासी विठ्ठलदास महाराज, संतोष महाराज आरणे, कांतीलाल रोकडे, देवळालीचे सरपंच आशिष गायकवाड, पंचायत समिती सदस्य राहुल सावंत, चंद्रहास निमगिरे,सुजित बागल,उदय ढेरे,दशरथ घाडगे, गौतम ढाणे,उमेश पाथ्रुडकर, प्रमोद बदे , धनंजय मोरे, नारायण नेटके,भारत रोकडे, सुंदरदास साबळे,बाळनाथ जगदाळे, विकास वीर, आशपाक जमादार, प्रशांत पाटील, मानसिंग खंडागळे, सरपंच काटुळे,विनय ननवरे , सुभाष हनपुडे, पायघन चेअरमन आदी मान्यवर उपस्थित होते. फिसरे गावाला पाणी मिळाले पाहिजे अशी भावना भरत (भाऊ) आवताडे व ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी यांनी व्यक्त केली होती.दहिगाव उपसासिंचनच्या माध्यमातून आपण फिसरे गावाला नक्कीच पाणी मिळवून देऊ असे आश्वासन दिले होते. आपणास पाणी मिळाल्यानंतर आपण माझ्या गटात प्रवेश करा त्यानुसार दहीगाव उपसासिंचनच्या माध्यमातून गावाला पाणी मिळवून दिले आहे. भविष्यामध्ये फिसरे गावाचे नंदनवन करण्यासाठी आपण विकास कामाच्या पाठीमागे उभे राहून आपला प्रपंचाची कशी सुधारणा होईल याचा विचार करावा. भरत (भाऊ) अवताडे यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख असताना केवळ गावाचा विकास होण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा देऊन संजय (मामा) शिंदे गटा मध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी आतापर्यंत केलेली कार्य नक्कीच कौतुकास्पद असून फिसरे ग्रामपंचायत आपल्या नेतृत्वाखाली एक हाती सत्ता मिळवली आहे. समाजाप्रती असलेल्या त्यांचा कळवळा जनसेवेची आवड समाजकारणातून राजकारण करण्याचा त्यांचा पिंड असून तालुक्याच्या राजकारणामध्ये अशा विकास प्रिय नेतृत्वाची गरज असून आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भरत(भाऊ) आवताडे यांना आपण योग्य संधी देऊन त्यांच्या कार्याचा नक्कीच आपण सन्मान करणार असल्याचे आमदार संजय (मामा) शिंदे यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी फिसरे गावासह पंचक्रोशीतील नागरीक  हजारोंच्या संख्येत.     उपस्थित होते.   

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

8 hours ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

9 hours ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

14 hours ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

1 day ago

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

2 days ago