करमाळा तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध आमदार संजयमामा शिंदे यांची ग्वाही

करमाळा प्रतिनिधी
आपण आमदार झाल्यापासून तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन, कुकडी प्रकल्प तसेच कोळगाव प्रकल्प येथील याअंतर्गत सिंचन करणारे सर्व शेतकरी पाण्याच्या बाबतीत समाधानी आहेत . शेतकऱ्यांच्या प्रगतीत जोपर्यंत फरक पडत नाही , तोपर्यंत मी कामच करत राहणार आहे . जेवढी संधी तुम्ही द्याल, तोपर्यंत चांगले काम करत राहणार असून, दरवर्षी मतदार संघातील रस्त्यासाठी शंभर कोटी चा निधी उपलब्ध करणार आहे.करमाळा तालुक्यातील जनतेच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन आ. संजयमामा शिंदे यांनी केले .
फिसरे येथे रविवारी 7 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर प्रवेश आणि विविध विकास कामांचे उद्घाटन सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते .यावेळी सोलापूर जिल्हा शिवसेना उपप्रमुख भरत आवताडे यांच्यासह फिसरे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रदीप दौंडे , उपसरपंच संदीप नेटके ,ग्रामपंचायत सदस्य हनुमंत रोकडे , विजय आवताडे, गणेश ढावरे या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसोबतच गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी आ. संजयमामा शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश केला .
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रकांत सरडे , आदीनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी झोळ , महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे , विठ्ठल कार्पोरेशन चे जनरल मॅनेजर भारत रोकडे , माजी पंचायत समिती विलास पाटील , पंचायत समितीचे सदस्य दत्ता जाधव , दूध संघाचे संचालक राजेंद्रसिंह राजेभोसले , जिल्हा परिषद सदस्य उद्धव माळी , देवळाली चे सरपंच आशिष गायकवाड , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत पाटील , पंचायत समिती सदस्य राहुल सावंत , कन्हेरगांव चे माजी उपसरपंच धनंजय मोरे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा शितल क्षिरसागर , कार्याध्यक्ष स्नेहल अवचर , उपतालुकाध्यक्षा रूपाली अंधारे , नंदीनी लुंगारे , पै. उमेश इंगळे , गुळसडीचे माजी सरपंच मानसिंग खंडागळे , सुजित बागल , नानासाहेब मोरे ,समाधान दौंड , काका पाटील , अशपाक जमादार , डॉ . विकास विर , प्रविण शिंदे गुरुजी , तात्या सरडे , माजी जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब निळ , उदय ढेरे आदी उपस्थित होते .
यावेळी सौ शीतल क्षीरसागर, चंद्रकांत सरडे , फिसरे चे सरपंच प्रदीप दौंडे , उपसरपंच संदीप नेटके , गौतम ढाणे , उमेश पाथ्रुडकर , राहुल सावंत , पंचायत समिती सदस्य दत्ता जाधव , राजेंद्रसिंह राजेभोसले , भरत आवताडे यांनी मनोगत व्यक्त केले .भरत आवताडे म्हणाले की , मामांसारखे नेतृत्व तालुक्यात लाभले हे आमचे भाग्य असून , या भागात पाणी मिळावे यासाठी मी आमदार शिंदे गटात प्रवेश केला .काम करण्याची धमक फक्त आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडेच आहे . फिसरे गावात आतापर्यंत मामांनी 95 लाखांचा निधी दिला आहे .
सूत्रसंचालन संजय गुटाळ , धनंजय शिंदे यांनी केले , तर आभार प्रदर्शन भारत रोकडे यांनी मानले .

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

7 hours ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

8 hours ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

14 hours ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

1 day ago

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

1 day ago