आ.संजयमामा शिंदे यांचा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा

करमाळा प्रतिनिधी
गेली तीन दिवसापासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या आंदोलनाला करमाळा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.
यासंबंधी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रांमध्ये ते म्हणतात की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मधील कर्मचाऱ्यांनी राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी लाखो एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून संपावर गेलेले आहेत. महाराष्ट्र शासनात एसटी महामंडळाचे विलीनीकरण करणेबाबत एसटी कामगारांची मागणी असून त्यांच्यामध्ये आक्रोश व उदासीनता निर्माण झालेली आहे. अनेक एसटी कामगार आजतागायत तुटपुंज्या पगारामुळे कर्जबाजारी झाले आहेत. त्यांचेकडे उदरनिर्वाहासाठी कोणतेही दुसरे साधन नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट आले असून महाराष्ट्रातील 29 कर्मचाऱ्यांना त्यामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे.
एसटी कामगारांना न्याय देण्याच्या दृष्टीने राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करणे आवश्यक आहे . त्यानी राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी पुकारलेल्या संपाला मी जाहीर पाठिंबा देत आहे .
या पाठिंब्याचे पत्र आमदार संजयमामा शिंदे यांच्या वतीने करमाळा आगारातील कर्मचाऱ्यांना कार्यकर्ते श्री तानाजी बापू झोळ, एड राहुल सावंत, नगरसेवक श्री प्रविण जाधव, पंचायत समितीचे सदस्य दत्ताभाऊ जाधव ,माजी सरपंच मानसिंग भैय्या खंडागळे, सरपंच आशिष भैया गायकवाड, आमदार संजयमामा शिंदे यांचे स्वीय सहाय्यक डॉ. विकास वीर, पोफळज विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन राजेंद्र पवार ,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शिवराज जगताप, राष्ट्रवादीचे युवक जिल्हा उपाध्यक्ष अश्पाक जमादार , राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष आझाद शेख यांचे उपस्थितीत देण्यात आले.

saptahikpawanputra

Recent Posts

केत्तुरला पुणे-मुंबई एक्स्प्रेसचा थांबा द्या! उपसभापती ॲड. अजिनाथ विघ्ने यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

करमाळा : प्रतिनिधी केत्तुर रेल्वे स्थानकावर पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी करमाळा…

12 hours ago

राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषदेच्या राष्ट्रीय सचिव पदी संजय मस्कर यांची निवड

    करमाळा प्रतिनिधी- राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषदेच्या राष्ट्रीय सचिव पदी साडे (ता. करमाळा, जि.…

1 day ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य केल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले देवाभाऊंचे अभिनंदन

  करमाळा प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती…

1 day ago

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई; ट्रॅक्टर चोरीची बीड-चिखलठाण टोळी जेरबंद तीन ट्रॅक्टर व ट्रॉलीसह ९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त; चार गुन्ह्यांची उकल

करमाळा (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या शेतातून उभे ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा करमाळा पोलिसांनी पर्दाफाश केला…

2 days ago

खुनशी राजकीय प्रवृत्तीमुळे दहिगाव उपसा सिंचन योजनेची वाताहत! २४ गावांपैकी १२ गावांनाही व्यवस्थित पाणी मिळाले नाही- भरत (भाऊ )आवताडे

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेची विद्यमान आमदार नारायण…

2 days ago

पुणे शिक्षक मतदार संघ कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक संघटनांचा निर्धार मुकुंद साळुंखे सर यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला वेग

करमाळा प्रतिनिधी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षक संघटना, टीडीएफ आणि भारतीय जनता…

4 days ago