करमाळा प्रतिनिधी करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी मार्केट यार्ड येथे काम करणारे कष्टकरी, श्रमजीवी व चाळणी कामगार, राखणदार यांना दिपावली निमित्त दिवाळी फराळाचे वाटप करून गोरगरीब लोकांसमवेत दिवाळी साजरी केली . यावेळी सुप्रसिद्ध व्यापारी संतोष गुगळे, अनिल चिवटे, नगरसेवक रामदास कुंभार ( सर ), इलेक्ट्रीक कॉन्ट्रॅक्टर पांडुरंग घरबुडवे, जे .जे . मित्रमंडळाचे अध्यक्ष रमेश (भाऊ )वीर,बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर, माजी नगरसेवक दिगंबर रासकर, उद्योजक बाळासाहेब बलदोटा, माजी नगराध्यक्ष जयराज चिवटे , टेंभुर्णी येथील उद्योजक आण्णा बागवाले , दादासाहेब कांबळे, मल्हारी चांदगुडे आदी उपस्थित होते .करमाळा तालुक्यातील राजकीय नेतेमंडळी पैकी सर्वाधीक , सर्वच स्तरातील जनतेचे अफाट प्रेम व लोकप्रियता लाभलेले नेते व मॅग्नेटीक पर्सनॅलिटी म्हणून माजी आमदार जगताप यांची संपूर्ण जिल्हयात ख्याती आहे . जगताप गटाइतके कट्टर , पार्टीसाठी जीव ओवाळून टाकणारे .व निष्ठेचे कार्यकर्ते लाभणे हिच आपली इस्टेट असल्याचे व नेते तयार करण्याची जगताप गट नर्सरी असल्याचे माजी आ .जगताप अभिमानाने सांगतात . जातीपातीच्या पलीकडे जात सर्वसामान्य उपेक्षीत समाजाला बरोबर घेत दिवाळी साजरी केल्याबद्दल उपस्थित सर्व कष्टकरी वर्गातील कामगारांनी माजी आ. जगताप यांनी आपले बद्दल दाखविलेली सद्भावना व आस्थेमुळे समाधान व्यक्त केले .
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…