करमाळा मतदारसंघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा … आ. संजयमामा शिंदे यांच्या शुभहस्ते व मा. आ. जयवंतराव जगताप यांचे अध्यक्षतेखाली

करमाळा प्रतिनिधी
करमाळा माढा मतदारसंघातील आवाटी, निमगाव ह, व शेलगाव क या गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उद्या दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी संपन्न होत आहे.उद्या सकाळी 10 वाजता आवाटी येथील सीना नदीवरती मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे भूमिपूजन होणार आहे. 1 कोटी 78 लाख निधी या कामासाठी मंजूर आहे.निमगाव ह येथे सकाळी 11 वाजता महादेव मंदिर सभामंडप , दलित वस्ती रस्ता सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे, जनसुविधा मधून गावांतर्गत रस्ता सिमेंट काँक्रीट करने, कोळगाव निमगाव गौंडरे रस्ता डांबरीकरण करणे या कामांचे भूमिपूजन तर जानपीर दर्गा सभामंडप लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. निमगाव येथील या सर्व कामांसाठी 1 कोटी 85 लाख निधी मंजूर आहे.शेलगाव येथे सकाळी 11:30 वाजता पांडे- शेलगाव – घोटी- केम रस्ता प्रजिमा १० सुधारणा करणे ,नाना दुकानदार ते काटूळे आबा वाडा रस्ता सिमेंट कॉंक्रिटीकरण करने,उद्धव शिंदे वस्ती ते विकास वीर वस्‍ती रस्‍ता मुरमीकरण करणे ,खरपा वस्ती, माळी वस्ती नं १ व मारुती मंदिर येथे हायमास दिवे बसविणे इत्यादी कामांचे भूमिपूजन होणार आहे शेलगाव येथील या कामांसाठी 2 कोटी 12 लाख निधी मंजूर आहे.या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आ. संजयमामा शिंदे यांच्या कार्यालयातून करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

9 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

12 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

1 day ago