करमाळा प्रतिनिधी
करमाळा माढा मतदारसंघातील आवाटी, निमगाव ह, व शेलगाव क या गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आ. संजयमामा शिंदे यांचे शुभहस्ते व माजी आ. जयवंतराव जगताप यांचे अध्यक्षतेखाली आज दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी संपन्न झाला.आवाटी येथील सीना नदीवरती मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे भूमिपूजन सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी आवाटीसह या परिसरातील विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असून येत्या आठवडाभरात आवाटी सबस्टेशन विषयी निर्णय होईल असे प्रतिपादन आ. संजयमामा शिंदे यांनी केले.
निमगाव ह येथील महादेव मंदिर सभामंडप , दलित वस्ती रस्ता सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे, जनसुविधा मधून गावांतर्गत रस्ता सिमेंट काँक्रीट करने, कोळगाव निमगाव गौंडरे रस्ता डांबरीकरण करणे या कामांचे भूमिपूजन तर जानपीर दर्गा सभामंडप लोकार्पण सोहळा संपन्न झाला.तर शेलगाव येथे पांडे- शेलगाव – घोटी- केम रस्ता प्रजिमा १० सुधारणा करणे ,नाना दुकानदार ते काटूळे आबा वाडा रस्ता सिमेंट कॉंक्रिटीकरण करने,उद्धव शिंदे वस्ती ते विकास वीर वस्ती रस्ता मुरमीकरण करणे ,खरपा वस्ती, माळी वस्ती नं १ व मारुती मंदिर येथे हायमास दिवे बसविणे
इत्यादी कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
निमगाव येथे बोलत असताना कोळगाव धरणांमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झालेल्या आहेत .त्या शेतकऱ्यांना पर्यायी जमीन मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून जिल्हाअधिकाऱ्यांसोबत यापूर्वीच मीटिंग झालेली आहे. याप्रश्नी आपण सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. शेलगाव येथे बोलत असताना दहिगाव योजनेची अपूर्ण कामे येत्या दोन वर्षात पूर्ण करून आपण 10 हजार 500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी आमदार जयवंतराव जगताप म्हणाले की , 2024 ला पुन्हा एकदा संजयमामा ला निवडून आणा आणि 50 वर्षे मागे गेलेला तालुका परत एकदा विकासाच्या वाटेवर आणून तालुक्याचा विकास साधण्याचे आवाहन जगताप यांनी केले .
यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता प्रक्षाळे , सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता क्रमांक 1 चे प्रताप कदम , उपविभागीय अधिकारी देशमुख , सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता उबाळे साहेब, शाखा अभियंता साहेब,उपसरपंच फिरोज जाहगिरदार , माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव माळी , सरपंच प्रशांत पाटील, राजेंद्र बारकुंड , आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक तानाजी झोळ ,आवाटी चे सरपंच संजय नलवडे , माजी जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब निळ , निमगाव सरपंच लखन जगताप , शेलगाव चे सरपंच अशोक काटूळे , कन्हेरगांव चे माजी उपसरपंच धनंजय मोरे ,ग्रामसेवक आबासाहेब खाडे , ग्रामपंचायत सदस्य लखन ढावरे ,रामचंद्र काटूळे, सचिन वी, राहुल कू, मयूर वीर, सुभाष पायघन, विवेक ननवरे ,गणेश जाधव, राजाराम वीर , समाधान दौंड , प्रवीण शिंदे गुरुजी , गुळसडी चे माजी सरपंच मानसिंग खंडागळे , डॉ. विकास वीर ,उपसरपंच श्रीकांत निळ , सुरज ढेरे , अमोल भोसले , सिद्धेश्वर जगदाळे , हनुमंत निळ , विक्रम कुंभार , सोमनाथ हलकरे , श्रीराम निळ , गणेश निळ, ऋषिकेश चव्हाण , दादा भोसले, अशोक काकडे , अशोक पाटील , महादेव डोके आदी उपस्थित होते .
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…