पोथरे सोसायटी नुतन पदाधिकाऱ्यांचा सावंतपरिवाराच्यावतीने सत्कार

करमाळा प्रतिनिधी  पोथरे वि. का. सेवा सहकारी संस्था मर्या. पोथरे चे बिनविरोध निवडून आलेले नूतन संचालक यांचा सावंत परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. सावंत परिवाराच्या वतीने मार्गदर्शक विठ्ठल आप्पा सावंत व पंचायत समिती सदस्य ॲड. राहुल सावंत यांच्या शुभहस्ते हा सत्कार संपन्न झाला. यावेळी ॲड राहुल सावंत यांनी सर्व पोथरे ग्रामस्थांचे व सर्व गटातटाच्या कार्यकर्त्यांचे व पदाधिकारी मंडळींचे आभार व्यक्त केले. निवडणूक बिनविरोध पार पाडून संस्थेचा खर्च वाचवला याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. त्याच बरोबर संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी ज्ञात-अज्ञात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जे परिश्रम घेतले त्याबद्दल सावंत परिवाराच्यावतीने सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी नूतन संचालक दत्तात्रय आढाव, संतोष वाळुंजकर, लक्ष्मण शिंदे, छगन शिंदे, सुभाष शिंदे, नितीन साळुंखे, आबासाहेब शिंदे, पंडित भांड, मच्छिंद्र दळवी, देविदास जाधव, प्रतिनिधी ईश्वर झिंजाडे या नूतन संचालकांचा सत्कार विठ्ठल आप्पा सावंत व  ॲड राहुल सावंत यांनी केला. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे धनंजय पाटील, अंगद शिंदे, विठ्ठल शिंदे , संजय शिंदे, भाऊसाहेब झिंजाडे, शामभाऊ झिंजाडे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी मा चेअरमन प्रभाकर शिंदे, जयद्रथ शिंदे, पाराजी शिंदे , दिनकर शिंदे, दादासाहेब शिंदे, नाना पठाडे, छगन लगस, बाळू जाधव, बबन जाधव, दादासाहेब झिंजाडे, बबन शिंदे, आजिनाथ शिंदे, रावसाहेब शिंदे, अशोक ढवळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

13 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

17 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

18 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago