रावगाव येथील तिरुपती बालाजी मंदिराचा रविवारी 21 नोव्हेंबर रोजी पायाभरणी समारंभ

करमाळा प्रतिनिधी                                         करमाळा तालुक्यात तिरुपती बालाजीच्या धर्तीवर रावगाव‌ येथे तिरुपती बालाजी मंदिर उभारण्यात येणार असुन तिरुपती बालाजी मंदिराचा पायाभरणी होमहवन मंदिर परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम रविवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती बालाजी भक्त मंदिराचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण बुधवंत यांनी दिली आहे.                       2017 सालापासून दरवर्षी रावगाव व शेजारील शाळांना शालेय साहित्याचे वाटप,रावगाव परिसरातील व तालुक्यातील नागरिकांना देवदर्शन यात्रा, कोरोना महामारीत आरोग्य तपासणी शिबिर, गोरगरिबांना दिवाळी फराळाचे वाटप,रावगाव येथील कोरोना सेंटरला आर्थिक मदत, हैदराबाद गोशाळा सेवा आदी सामाजिक उपक्रमानै समाजसेवेचे कार्य चालू आहे. दान करणे ही भारतीय समाजाची पंरपरा असुन विद्यार्थी, वानप्रस्थी,सन्यासी यांना जीवन व्यतीत करण्यासाठी संसाधन उपलब्ध करून देणे ,मंदिर तिर्थक्षेत्रातील धर्मशाळा इतर समाजपयोगी स्थानांचे निर्माण करणे सहयोग करणे हा समाजातील श्रीमंत लोकांचा स्थायीभाव राहिला असून सामाजिक कर्तव्य मानल जात आहे. याच पंरपंरेला मानुन येथील
श्री तिरुपती बालाजी मंदिर उभारणीच्या या कार्यात सकल समाजाने सात्त्विक दान करुन सहकार्य करावे तिरुपती बालाजी मंदिराच्या पायाभरणी समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन लक्ष्मण बुधवंत यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

4 hours ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

5 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

1 week ago