करमाळा नगरपालिकेतील रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याची माजी नगरसेविका सविता कांबळे यांची मागणी

करमाळा प्रतिनिधी                                         करमाळा नगरपालिकेतील ६२ रोजंदारी सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सफाई कर्मचारी म्हणून नगरपालिकेमध्ये घेण्यात यावे. अशी मागणी माजी नगरसेविका सविता कांबळे यांनी केली आहे.        याबाबत कांबळे यांनी  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री       उद्धवसाहेब ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे.      कोरोना संकट काळात करमाळा नगर परिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे राहिले आहे. कोरोनाच्या भीषण महामारीत एक दिवस देखील सुट्टी न घेता त्यांनी खूप मोलाचे योगदान दिले आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने कोविड काळामध्ये बहुमोल सेवा दिल्याबद्दल रोजंदारीवरील ६२ सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सफाई कामगार म्हणून सेवेत सामावून.  घ्यावे व कर्मचाऱ्यांचा उचित सन्मान करावा. असा उल्लेख कांबळे यांनी निवेदनात केला आहे.सदर मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास बावीस नोव्हेंबर रोजी करमाळा तहसील येथे कोरोनाचे सर्व नियम पाळून लाक्षणिक उपोषण केले जाईल. असा इशाराही कांबळे यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती नगरविकास मंत्री, जिल्हाधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

18 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

21 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

22 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago