पांगरे ग्रामपंचायतीच्यावतीने दारूबंदीचा ठराव इतरांनी आदर्श घेण्याची गरज

करमाळा  प्रतिनिधी  पांगरे, ता. करमाळा येथे कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून, पांगरे ग्रामपंचायतीने गावात Be positive आपला गाव ठेवू कोरोना Negative हा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानिमीत्ताने गावातील प्रत्येक कुटुंबास एक सुरक्षा कीट स्वनिधीतून कोरोना बाबतचे शासनाचे नियमांचे पालन करुन वाटप करण्यात आले. सदरचे कीट मध्ये सॅनिटाइज़र बाटली, ४ नग ट्रिपल लेयर मास्क, साबण, माहितीपत्रक या गोष्टीचा समावेश आहे. या सुरक्षा कीटचे वाटप करताना मास्क, साबण व सॅनिटाज़र याचा वापर व महत्व गावातील नागरिकांना पटवून सांगण्यात आले. कोरोना पासून बचाव हाच उपाय आहे. कोरोनाची भिती बाळगू नये व कोरोना पासून दुर कसे रहावे व कुटुंबाची कशी काळजी घ्यावी या बाबत ग्रामस्थांना अवगत करणेत आले. नियमीत हात धुवा सुरक्षित अंतर ठेवा, मास्कचा वापर करा, गरज नसताना घराबाहेर पडू नये हे सांगताना समाजा बाबतची आपली जबाबदारी हेही पटवून देण्याचा प्रयत्न केला.
यापूर्वी पांगरे गावात कोरोना प्रतिबंध लस तीन वेळा शिबिर घेऊन 45 पेक्षा जास्त वयाचे 260 पेक्षा जास्त नागरिकांना गावा पर्यंत लस पोहच केली आहे.
सुरक्षा कीटचे वाटप करताना सरपंच ॲड. दत्तात्रय सोनवणे, उपसरपंच श्री सचिन पिसाळ, सदस्य श्री महेश टेकाळे, श्री विवेक पाटील, श्री गणेश वडणे, श्री धनंजय गायकवाड, श्री ज्ञानेश्वर गुटाळ तसेच श्री जोतिराम गाडे पाटील, श्री महेश शेळके इ. तसेच पोलिस पाटील श्री युवराज सावंत व ग्रामपंचायत कर्मचारी गोपाळ कोळी, मच्छिद्र उघडे उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

17 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

20 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

22 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago