करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचे उद्योजक राजुरी गावचे सुपुत्र संतोष काका कुलकर्णी यांचे कार्य युवा पिढीसाठी प्रेरणादायी असून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या संतोष काका कुलकर्णी यांचा आदर्श घेऊन युवा पिढीनी वाटचाल करावी असे मत नारायण आबा पाटील समर्थक युवा नेते आबासाहेब टापरे यांनी व्यक्त केले. संतोष काका कुलकर्णी यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त राजुरी ग्रामस्थांच्यावतीने आयोजित वाढदिवस सत्कार कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की राजुरी गावच्या विकासासाठी संतोष काका कुलकर्णी यांचे सदैव मार्गदर्शन लाभत असुन समाजसेवेचे कार्य चालू ठेवुन युवापिढीला मार्गदर्शन करण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटील गटाचे युवा नेते पृथ्वीराज भैय्या पाटील,प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव दिपक चव्हाण, करमाळा तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंके, ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले, मेजर जगदाळे, राजुरी चे सरपंच डॉ.अमोल दुरंदे, पवनपुत्रचे संपादक पत्रकार दिनेश मडके उपस्थित होते. संतोष काका कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार युवा नेते पृथ्वीराज भैय्या पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी सत्काराला उत्तर देताना संतोष काका कुलकर्णी म्हणाले की राजुरी गावाच्या विकासासाठी आपण गट तट पक्ष याचा विचार न करता गावाचा विकास हेच ध्येय ठेवून चांगले काम करणाऱ्यांना आपला सदैव पाठिंबा राहील करमाळा तालुक्यात उद्योजक निर्माण होण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असून करमाळा तालुक्यात उद्योग उभारण्यासाठी आपण कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. संतोष काका कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे प्रदेश सरचिटणीस दीपक चव्हाण यांनी संतोष काका कुलकर्णी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना म्हणाले की करमाळा तालुक्यात उद्योग उभारणीसाठी आपण आमच्यासारख्या युवा पिढीला मार्गदर्शन करून उद्योजक घडवण्याची कार्य करावे याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले युवा नेते पृथ्वीराज भैय्या पाटील, भाजपचे दीपक चव्हाण, अमरजीत साळुंखे, पत्रकार दिनेश मडके यांनी संतोष काका कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास राजुरी चे सरपंच डॉक्टर अमोल दुरंदे, माजी सरपंच गणेश जाधव, मेजर जगताप,शुभम कुलकर्णी, राजुरी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य.राजु भोसले.मनोज शिंदे. बंडु गुरूजी. एकनाथ शिंदे. सुनिल कुलकर्णी. या कार्यक्रमाचे आयोजन माजी आमदार नारायण आबा पाटिल गटाचे राजुरी येथील नेते राजु भोसले व आबासाहेब टापरे व गावातील पाटील गटाचे कार्यकर्ते यांनी केले होते.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…