करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील केम रेल्वे स्टेशन येथे हैदराबाद-मुंबई या रेल्वेगाडीचा पूर्वीपासून चा थांबा कायम करावा. तसेच *विजापूर-मुंबई व पंढरपूर-मुंबई या रेल्वेगाडया लवकर सुरू करून त्यांना केम येथे थांबा मिळावा. अशी मागणी केम येथील विद्यार्थी, नोकरदार*, पासधारक व प्रवासी वर्गातून होत आहे.
करमाळा तालुक्यातील केम हे सर्वात मोठे गाव असून या गावची लोकसंख्या सुमारे बारा हजाराच्या आसपास आहे. तसेच हे गाव कुंकासाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. कोरोणा काळाच्या अगोदर केम येथे हैदराबाद-मुंबई व चेन्नई-मुंबई मेल या रेल्वेगाड्या थांबत होत्या. त्यामुळे सोलापूर, बाशीं, कुर्डुवाडी, पंढरपूर, पुण्याला जाणऱ्या विद्यार्थी, पासधारक, नोकरदार व प्रवाशी यांना येण्या-जाण्याची सोयीचे होत होते. कोरोनामुळे या गाडया बंद झाल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे हळूहळू रेल्वेगाडया पूर्व पदावर येत आहेत. हैदराबाद-मुंबई ही गाडी सुरू आहे. परंतु, अजूनही या गाडीला केम रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात आलेला नाही.
दिनांक ०१ डिसेंबर पासून चेन्नई-मुंबई ही गाडी सुपरफास्ट झाली असल्यामुळे त्या गाडीची वेळ बदलली असून ती केम येथे पहाटे ५:३० वा येणार आहे. त्यामुळे ही गाडी गैरसोयीची आहे. तसेच या गाडीचा रेल्वे विभागाने थांबा रद्द केला आहे. त्यामुळे सोलापूर बार्शी, कुर्डुवाडी, पंढरपूर ला जाणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार, पासधारक प्रवाशी यांना गाडी नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अगोदरच दिड वर्ष झाले कोरोनामुळे शाळा बंद आहेत. आता शाळा सुरू झाल्या आहेत तर विद्यार्थ्यांना जाण्या-येण्यासाठी गाडी नसल्याने विद्यार्थी घरीच आहेत. ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती बेताची आहे ते विद्यार्थी मोटार सायकलवरून ये-जा करतात. परंतु, काही विद्यार्थी येण्या-जाण्यासाठी काहीच साधन नसल्याने घरीच आहेत. दीडशे ते दोनशे विद्यार्थी रेल्वेने अप-डाऊन करतात. पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांनाही आता कोणतीच गाडी नाही. खाजगी वाहनाने व्यापारी वर्ग, प्रवासी यांना प्रवास करावा लागत आहे.
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…