करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यामध्ये सामाजिक कार्य करत असताना जनतेच्या कल्याणासाठी आपण राजकीय भुमिका घेऊन भारतीय जनता पार्टीचे काम करीत असुन येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीत जगताप गटाचे काम करणार असल्याचे मत युवा नेते शंभुराजे जगताप यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.पुढे बोलताना म्हणाले की जगताप गटाचे नेते माजी आमदार जयवंतराव जगताप हे तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्याबरोबर तालुका राजकारणात काम करत असून येणाऱ्या निवडणुकीत जयवंतराव जगताप गटासाठी जी भूमिका घेतील त्या पद्धतीने आपण जगताप गटासाठी काम करणार असून येणाऱ्या काळामध्ये कुणावर युती करायची हा निर्णय सर्वस्वी साहेब घेणार असून निवडणुकीत काही होऊ शकते त्यामुळे आम्ही त्या विचाराला प्राधान्य देऊन जो आमच्याशी युती करेन त्यांच्याबरोबर आम्ही युती करणार आहे. गेल्यावेळी बागल गटाबरोबर युती केल्यामुळे आमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. माझे बंधू नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी करमाळा नगरपालिकेच्या माध्यमातून चांगले काम केले असून जनता जगताप गटांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून येणाऱ्या निवडणुकीत जगताप गट सत्तेत येणार आहे.देवी गट सावंत गट कोण कोणाबरोबर यूती करतो हे महत्त्वाचे नसून माजी आमदार जयवंतराव जगताप ठरवतील त्यापध्दतीने नगरपालिका निवडणुकीत गटाची वाटचाल राहणार आहे. माजी आमदार नारायण आबा पाटील गटाशी चांगले असुन पाटील गटाबरोबर युती होऊ शकते . संजय मामा समर्थक म्हणून काम करणारे गट जगताप गटाबरोबर कुणाबरोबर राहणार हा निर्णय आमदार संजयमामा शिंदे घेतील. कोरोना महामारीच्या काळामध्ये आपण मास्क, सॅनिटायझर याचे तालुक्यामध्ये वाटप करत जनजागृती करण्याचे काम केले आहे.माझा वाढदिवस साध्यापध्दतीने साजरा करीत सत्कारप्रंसगी भेट म्हणुन आलेल्या तेरा हजार वहया असून जिल्हा परिषद शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप करण्यात येणार आहे. कोरोना महामारी मध्ये शंभुराजे जगताप यांनी चांगले काम केल्याबद्दल कोरोना योध्दा म्हणुन शंभुराजे जगताप यांचा सत्कार करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी कोरोनाकाळात चांगले काम केल्याबद्दल पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.यावेळी ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर, अशोक नरसाळे, आशपाक सय्यद, अलीम शेख, दिनेश मडके, जयंत दळवी अशोक मुरूमकर आण्णा काळे, विशाल घोलप संजय चौगुले, युसुफ शेख सर अविनाश जोशी, सचिन जव्हेरी, सुनील भोसले हे उपस्थित होते.
माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…