करमाळा प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला कोळगाव धरण परिसरातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असून कोळगाव स्टेशन लवकरच कार्यान्वित होईल व या परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा शाश्वत फायदा होईल अशी माहिती करमाळा मतदार संघाचे आमदार संजय मामा शिंदे यांनी दिली. याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, गेल्या वर्षीपासून कोळगाव धरण 100% भरत असल्यामुळे या परिसरातील गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती बारमाही पिकांची लागवड झालेली आहे. असे असूनही सबस्टेशन वरती अतिरिक्त लोड असल्यामुळे पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नव्हता. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची नवीन सबस्टेशनची मागणी अनेक दिवसापासून सुरू होती. या मागणीला मूर्तस्वरूप प्राप्त झाले असून आवाटी येथे नवीन सबस्टेशउभारणीला मान्यता मिळालेली आहे.धरण उशाला असूनही कमी दाबाने मिळणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे येथील नागरिकांच्या घशाला मात्र कोरड होती. अपुऱ्या दाबाने व प्रत्यक्षात 4 तासच या भागात वीज पुरवठा केला जात होता.परंतु आता नवीन सबस्टेशन मुळे हा प्रश्न निकाली निघणार आहे. पूर्वीच्या कोळगाव सबस्टेशन वरती गौंडरे, आवाटी, नेरले, निमगाव ह, हिवरे, कोळगाव धरण असा लोड होता. आता नवीन सबस्टेशन झाल्यामुळे कोळगाव सबस्टेशनवरील लोड कमी होणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना पुरेशा दाबाने 8 तास वीज पुरवठा सुरळीतपणे सुरू होईल.
ऑगस्ट 2020 मध्ये आवाटी येथे सबस्टेशन उभारण्यासंदर्भात आ. संजयमामा शिंदे यांनी पत्रव्यवहार केला आणि त्याला 15 महिन्याच्या कालावधीतच मूर्तस्वरूप प्राप्त झाल्यामुळे या परिसरातील नागरिक आमदार संजयमामा शिंदे यांचे आभार व्यक्त करत आहेत. नव्याने उभारण्यात येणाऱ्या आवाटी सबस्टेशन वरती कोळगाव धरणासह गौंडरे, आवाटी व नेरले या गावांना वीज पुरवठा केला जाणार आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…