मा.आमदार जयवंतराव जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त महास्वच्छता अभियानाला सुरुवात         

करमाळा प्रतिनिधी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपालिकेच्या वतीने महास्वच्छता अभियानाचे उद्घघाटन नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या हस्ते आणि मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.गत सात वर्षांपासून माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या  वाढदिवसानिमित्त वैभवराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे महास्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.यंदा देखील या अभियानाला एसटी बस स्थानकासमोरुन सुरुवात करण्यात आली आहे.टप्प्याटप्प्याने शहरातील सर्व प्रभागात हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी दिली.या अभियानाला शहरवासियांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील करण्यात आले.याप्रसंगी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी नगरसेवक ॲड.नवनाथ राखुंडे,अमोल जाधव यांच्यासह जगताप प्रेमी नागरिक आणि नगरपालिकेतील कर्मचारी उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago