करमाळा प्रतिनिधी पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत मिळालेल्या निधीतून कसलीही कपात करू नका. बंद पाणीपुरवठा योजनेची वीज बिले दुरुस्ती करा. सरपंच मानधन वाढवा आदी १८ मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या बंदला तालुक्यात प्रतिसाद मिळाला आहे. सरपंच परिषदेच्या वतीने बंद आंदोलनाचे आवाहन करण्यात आले आहे.पंधराव्या वित्त आयोग निधीतून कसल्याही प्रकारची कपात करू नये. हा निधी फक्त विकासकामांसाठीच वापरावा. कोरोना काळात सरपंचांनी गावपातळीवर केलेले काम अविस्मरणीय आहे. या कालावधीत राज्यातील सुमारे ३० पेक्षा अधिक सरपंचाचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी. सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनात वाढ करावी. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ड यादीच्या घरकुल सर्वेक्षणामध्ये चुका आहेत, त्या दुरुस्त कराव्यात. संगणक चालक नियुक्तीचा अधिकार ग्रामपंचायतींना असावा, पाणी पुरवठा योजना बंद असताना वीज आकारणी झालेली दुरुस्ती करावी. प्रत्येक जिल्हा परिषदेत सरपंच कक्ष असावे. मुंबई येथे सरपंच भवन बांधावे. जिल्हा नियोजन मंडळ व विधानपरिषदेत सरपंचांना स्थान मिळावे. विधान परिषद निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकारी मिळावा. पंचायत समिती स्थरावर दरमहा तालुकास्तरीय सरपंच बैठक आयोजित करावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे व सरचिटणीस adv.विकास जाधव यांच्या आवाहनानुसार ग्रामपंचायत बंद आंदोलनास तालुक्यात मोठा सहभाग मिळाल्याचा दावा सरपंच परिषदेचे करमाळा तालुका अध्यक्ष डॉ. अमोल दुरंदे यांनी केला आहे.सरपंच परिषदेने पुकारलेल्या आंदोलनात राजुरी, कंदर, सावडी,जेऊर, कोर्टी,मांजरगाव, खडकी, जेऊर, भिलारवाडी, पोंधवडी, वरकटणे, गोयेगाव ता.करमाळा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप लावून विविध मागण्यांसाठी शासनाचा निषेध नोंदविला.हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ऐतिहासिक आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस ॲड. विकास जाधव यांनी बार्शी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. या बंदला ग्रामसेवक संघटना, संगणक परिचालक संघटना यांनीही या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. एक दिवसाचा हा प्रतिकात्मक बंद आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या काळात हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे, असा राज्य चिटणीस ॲड. विकास जाधव यांनी इशारा दिला आहे.या बंद मध्ये सरपंच मनीषा भास्कर भांगे, सरपंच निलेश कुटे ,सरपंच गायत्री कुलकर्णी, सरपंच भाऊ शेळके, सरपंच गिरंजे, सरपंच भगवान तनपुरे, सरपंच दादासाहेब गायकवाड, सरपंच अंकुश शिंदे यांच्यासह अनेक सरपंचांनी सहभाग नोंदवला.
करमाळा प्रतिनिधी मस्साजोग जिल्हा बीड येथील लोकनियुक्त सरपंच कै. संतोष देशमुख यांची दिवसाढवळ्या निर्घुण हत्या,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील सूर ताल संगीत विद्यालयाच्या वतीने प्रती वर्षाप्रमाणे दि. ६ जानेवारी २०२५…
करमाळा प्रतिनिधी- भाजपा नेते,भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती करमाळा भाजपाकडून विविध कार्यक्रमांनी…
करमाळा प्रतिनिधी गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्था येथे उप प्रवर्तक प. पु. श्रुत मुनीजी म.सा…
करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी सोलापूर पश्चिमच्या जिल्हा चिटणीसपदी विनोद महानवर यांची निवड जिल्हाध्यक्ष चेतनसिंह…
करमाळा प्रतिनिधी करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांना रब्बी आवर्तना द्वारे शेतीसाठी उजनीतून पाण्याची पाळी देण्यात यावी…