करमाळा प्रतिनिधी
विकासापासून वंचित असलेल्या करमाळा तालुक्याला भरीव निधी खेचून आणण्यात आमदार संजयमामा शिंदे यांना यश येत असून महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात करमाळा तालुक्याला 100 कोटीहून अधिक निधी मंजूर झालेला असून करमाळा तालुक्यातील अतिशय महत्त्वाचे व निकडीचे प्रश्न या माध्यमातून सुटले जाणार आहेत.
राज्यमार्ग क्रमांक 202 कुर्डूवाडी – माढा- यावली या रस्त्यासाठी पुरवणी अर्थसंकल्पामध्ये 19 कोटी 65 लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. हा रस्ता सोलापूरला जाण्यासाठी पर्यायी व कमी अंतर असलेला रस्ता आहे . जिल्हा हद्द ते कोंढार चिंचोली- खातगाव ते पोमलवाडी प्रजिमा 3 ला जोडणारा रस्ता प्रजिमा 190 मध्ये मोठा पूल (डिकसळ पूल) बांधण्यासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तालुक्याच्या रस्ते विकासासाठी एकूण 69 कोटी 65 लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. तसेच कुर्डूवाडी येथील ट्रामा केअर युनिट बांधकाम करण्यासाठी 7 कोटी 23 लाख व करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथील अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता निवासस्थान बांधकामासाठी 18 कोटी 68 लाखयामध्ये आरोग्यविषयक सुविधा याबाबतीत करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथील 50 बेडचे श्रेनीवर्धन करून 100 बेड रुग्णालय बांधकाम करण्याकरिता 25 कोटी रुपये निधीची तरतूद केलेली आहे. अशी 51 कोटी रुपयांची तरतूद आरोग्यविषयक सुविधांसाठी करण्यात आलेली आहे.
त्यामुळे 2021 चे हिवाळी अधिवेशन करमाळा तालुक्यासाठी खूप काही देणारे ठरले आहे .आमदार शिंदे यांच्या या यशाबद्दल तालुक्यातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. यापूर्वीही आमदार शिंदे यांच्या माध्यमातून विज समस्यावरती तोडगा म्हणून आवाटी येथे नव्याने उभारण्यात येत असलेले सबस्टेशन तसेच कोर्टी सबस्टेशन मधील क्षमतावाढ या कारणांमुळे विजेचा प्रश्न सुटण्याससही मदत होणार आहे. एकूणच 2021 हे वर्ष संपत असताना आमदार शिंदे यांनी मंत्रालयीन स्तरावर उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या पाठबळामुळे आपली ताकद दाखवून देऊन करमाळा तालुक्यासाठी भरीव निधी खेचून आणण्यामध्ये यश मिळवलेले आहे.
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…