जातेगाव ते टेंभुर्णी महामार्गाचा मार्ग मोकळा… राष्ट्रीय महामार्गं मंडळाला महाराष्ट्र शासनाचा ना हरकत दाखला…आ.संजयमामा शिंदे यांची माहिती


करमाळा प्रतिनिधीे
जातेगाव ते टेंभुर्णी रस्त्याला अवश्यक ती नाहरकत राज्य शासनाने या अधिवेशनात दिली आहे,त्यामुळे राष्ट्रीय महामार्गं मंडळाचा नगर ते टेंभुर्णी महामार्गाचा मार्ग मोकळा झाला आहे. अशी माहिती करमाळा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
जातेगाव ते टेंभुर्णी या रस्त्याचे काम अनेक वर्षापासून रखडले आहे .हा रस्ता राज्य शासनाच्या अखत्यारीत होता.तो राष्ट्रीय महामार्ग होणार असल्याने त्यासाठी राज्य शासनाचा ना हरकत दाखला आवश्यक होता. जातेगाव ते नगर हा रस्ता यापूर्वीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित झालेला होता. तसेच सोलापूर ते पुणे हा रस्ताही राष्ट्रीय महामार्ग कडेच आहे त्यामुळे जातेगाव ते टेंभुर्णी रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे देणे आवश्यक होते. त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न आमदार शिंदे यांनी केले. नाहरकत न मिळाल्याने राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले होते. यासाठी आमदार संजयमामा शिंदे हे गेल्या 2 वर्षापासून पाठपुरावा करत होते. त्यांना या अधिवेशनात यश आले असून राज्य शासनाने राष्ट्रीय महामार्गाला ना हरकत दिलेले आहे.
हा रस्ता करण्यासाठी शासनाने जमीन अधिग्रहण केले असून त्याचा मोबदला शेतकऱ्यांना दिला आहे. परंतु प्रत्यक्षात ते काम सुरू करण्यासाठी राज्य शासनाची परवानगी आवश्यक होती. ही परवानगी मिळविण्यासाठी आमदार शिंदे प्रयत्नशील होते.
महाराष्ट्र शासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यातील असमन्वयामुळे हे काम रखडले होते. रस्ता खराब असल्याने नगर ते टेंभुर्णी पर्यंत अनेक अपघात होऊन त्यात अनेक लोक दगावले आहेत. या पार्श्वभूमीवर हा रस्ता होणे गरजेचे होते. जातेगाव ते टेंभुर्णी या रस्त्याच्या हस्तांतरणासाठी ना हरकत परवानगी मिळण्याच्या कामी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विशेष सहकार्य लाभल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

20 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago