आ. संजयमामा शिंदे यांनी तालुका वासियांचा विश्वास सार्थ ठरविला : माजी आ जयवंतराव जगताप 

*आ संजयमामा शिंदे यांनी तालुका वासियांचा विश्वास सार्थ ठरविला : माजी आ जयवंतराव जगताप*.     करमाळा प्रतिनिधी – सध्या सुरु असलेल्या राज्य शासनाच्या हिवाळी अधिवेशना मधे पुरवणी अर्थसंकल्पामधे करमाळा मतदार संघातील रस्ते, आरोग्य आदी विविध विकास कामांसाठी जवळपास १२० कोटी रुपयांची भरीव तरतुद करून घेण्यात आ .संजयमामा शिंदे यांना यश आल्यामुळे संजय मामांनी तालुका वासियांचा विश्वास सार्थ ठरविल्याचे मत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केले आहे . यामधे दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा डिकसळ पुलासाठी ५५ कोटी रुपयांची तरतूद केलेबद्दल , जातेगाव ते टेंभुर्णी रस्ता NHAI कडे वर्ग करणेसाठी राज्य शासनाची ना -हरकत घेणे, आवाटी सबस्टेशनला मंजूरी, दहिगाव व कुकडीची नियमीत आवर्तने, कृष्णा खोरे महामंडळा कडून दहिगाव योजनेचा लाखो रुपयाचा वीज बील भरणा, भुसंपादनाचा मोबदला,एमआयडीसी ला चालना, कॉटेज हॉस्पीटलमध्ये   सिझेरीन सह अन्य अत्याधुनिक सोयीसुविधा देणे, शेततळ्यांचे थकीत अनुदानास मंजूरी, आमदार आपल्या दारी उपक्रम राबविणे यासह रस्ते, वीज, पाणी आरोग्य या बाबतीत आ . शिंदे करीत असलेल्या कामांमुळे व सातत्याने मतदार संघातील विकास कामांबाबत शासन दरबारी करत असलेल्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील जनतेतून समाधान व्यक्त होत असलेचेही माजी आमदार जगताप यांनी सांगीतले .

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

4 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

1 week ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

1 week ago