दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली मकाईचे यशस्वी गाळप सुरू शेतकऱ्याच्या खात्यावर 2200 रुपये पहिला हप्ता जमा

करमाळा प्रतिनिधी                                         करमाळा तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्यांने २०२१-२२ या हंगाममध्ये गाळप केलेल्या ऊसाचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला आहे. याबरोबर कारखान्याने आसवनी प्रकल्पही सुरु झाला असून यातून उत्पादन झालेल्या पहिल्या टॅंकरचे पूजन करण्यात आले आहे.
करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखाना बागल गटाचे युवा नेते दिग्विजय प्रिन्स बागल यांच्या नेतृत्वाखाली यावर्षी अडचणीतून मार्ग काढत सुरु झाला असून काटकसरीचे धोरण स्वीकारत सुरु झालेला हा कारखाना सध्या योग्य दिशेने यशस्वीपणे वाटचाल करीत गाळप सुरू आहे . त्यातच ऊसाचा पहिला हप्ता २२०० रुपयांनी जमा झाला असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. या वर्षात ३० नोव्हेंबरपर्यंत गाळप झालेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत, असे सांगण्यात येत आहे.याबरोबर कारखान्याने यावर्षीच्या गळीत हंगाम 2021- 22 मध्ये आसवनी प्रकल्पातून उत्पादीत झालेल्या स्पिरिटच्या पहिल्या टँकरचे पूजन केले आहे.यावेळी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष उत्तम विठ्ठल पांढरे, संचालक नंदकिशोर भोसले, रामचंद्र हाके, कार्यकारी संचालक एच. पी. खाटमोडे, कार्यालयीन अधिक्षक एल. ए. बनसोडे, डिस्टिलरी मॅनेजर संकेत बागल, खरेदी अधिकारी एम. डी. रोकडे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते.
saptahikpawanputra

Recent Posts

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार! ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धेत अक्षय पिट्टा, श्वेता विडप व गंधम तुलसी यांचा सहभाग

करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…

18 hours ago

करमाळा तालुक्यात शेतीपंपांची वीज कपात म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रकार शंभूराजे जयवंतराव जगताप यांचा इशारा ​

​करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…

21 hours ago

बैलपोळ्यानिमित्त गोसेवेचा जागर; ९० गोमातांच्या सान्निध्यात भक्तिमय सोहळा गुरु गणेश दिव्यरत्न गो-पालन संस्थेत पुरणपोळीचा नैवेद्य, विधिवत गोपूजन अन् गोसेवेचा संदेश

करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…

2 days ago

करमाळ्यात ‘ज्ञान माऊली’ सांस्कृतिक उपक्रम उत्साहात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा जागर; बाल वारकऱ्यांपासून दिग्गजांचा सन्मान

  करमाळा प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे…

3 days ago