करमाळा प्रतिनिधी प्रा.प्रवीण अंबोधरे दत्तकला शिक्षण संस्थेच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी पदी डॉ.विशाल बाबर सर यांची निवड झाली आहे असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ यांनी संस्थेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून सांगितले आहे.संस्थेतील चांगल्या कामाच्या जोरावर अल्पावधीतच डॉ.विशाल बाबर यांची सर्वोच्च पदावर पदोन्नती झाली आहे, डॉ.बाबर हे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील श्रीपुर गावचे आहेत त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे त्यांच्या मुळ गावीच झाले त्यानंतर त्यांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षण हे कर्नाटक राज्यामध्ये घेतले व डाॅक्टरेट पदवी राजस्थान मधील उदयपुर येथुन घेतले आहे.डॉ.बाबर यांचा दत्तकला शिक्षण संस्थेतील प्रवास व त्यांचे काम अत्यंत उल्लेखनीय आहे ते संस्थेमध्ये 2016 साली सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले अल्पावधीतच त्यांनी त्यांच्या कामाच्या जोरावर संस्थेच्या अनुसया इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या पदी निवड झाली व त्यांनतरही त्यांच्या कामाचा चढता आलेख कायम राहिला व त्याच कामाची पोच पावती म्हणून संस्थेच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी पदि निवड झाली आहे.त्यानिमित्त संस्थेचे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ सर म्हणाले कि संस्थेमधील प्रत्येक कर्मचाऱ्याने स्वतःला सर्वोच्च पद मिळावे यासाठी प्रयत्न करावे व चांगले काम करावे अशी प्रतिक्रिया व्यक्त करुन सर्व कर्मचारी वर्गाला प्रोत्साहित केले.तसेच या निवडीबद्दल बोलताना डॉ.विशाल बाबर सर म्हणाले कि संस्थेमध्ये काम करत असताना सतत संस्थेच्या हिताचे काम करुन सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे असे म्हणाले,तसेच मुख्य प्रशासकीय अधिकारी या पदावर काम करण्याची संधी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ सर सचिव प्रा.माया झोळ मॅडम यांनी मला दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…