करमाळा/प्रतिनिधी
मुलींच्या मनातील न्युनगंड काढून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी स्मार्ट गर्ल उपक्रम महत्वाचा ठरणार आहे.स्मार्ट गर्ल प्रशिक्षणातून मुली आत्मनिर्भय बनतील,असे मत येथील साहित्यिक प्रा. प्रदीप मोहिते यांनी व्यक्त केले.भारतीय जैन संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या स्मार्ट गर्ल कार्यशाळेतील विद्यार्थिनींचा गुणगौरव येथील यश कल्याणी संस्थेच्या वतीने करण्यात आला, त्यावेळी प्रा. मोहिते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष डॉ.ॲड.बाबूराव हिरडे हे होते. व्यासपीठावर यशकल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश करे-पाटील,भारतीय जैन संघटनेचे ग्रामीण सचिव प्रदीप बलदोटा,तसेच व्यापारी निलेश कटारिया,अकॅडमीच्या संचालिका व भारतीय जैन संघटनेच्या महिला अध्यक्षा ज्योती मुथा तसेचसाहित्यिका व मराठी विभाग प्रमुख डॉ.प्रा.संगिता पैकेकरी- मोहिते या उपस्थित होत्या पुढे बोलताना श्री. मोहिते म्हणाले,की आजच्या मुलींना शिक्षण, संस्कार , स्वसंरक्षण, व स्वयंनिर्णय घेण्याचे घेण्याचे कसब स्मार्ट गर्ल कार्यशाळेतून दिले ही बाब महत्वाची आहे. यावेळी डॉ. ॲड.बाबुरावजी हिरडे यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील यांनी केले.सूत्रसंचालन स्मार्ट गर्ल कार्यशाळेच्या संचालिका ज्योती मुथा यांनी केले. यावेळी श्रुती कटारिया समीक्षा कटारिया,उन्नती सोळंकी ओपल लूनावत, अनुश्री मोहिते यांचीही उत्स्फूर्त भाषणे झाली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ प्रीती कटारिया यांनी केले. यावेळी ३५ विद्यार्थीनी सह पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…