करमाळा येथे सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली…

 

करमाळा प्रतिनिधी. पद्मश्री, सेवाव्रती, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे नुकतेच दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.अतिशय खडतर अशा संघर्षाला सामोरे जात त्यांनी अनाथ मुलांवर मायेचे छत्र धरले होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला आहे.   अशा थोर माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करमाळा शहरातील यशकल्याणी सेवाभवन येथे करण्यात आले होते,करमाळा शहर व तालुक्यातील नागरिक, सर्व समाजसेवक व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार यांनी उपस्थित राहून आदरणीय माईंना आपल्या शब्दांतून भावना मोकळ्या करत श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी यशकल्याणी चे अध्यक्ष गणेश करे पाटील,जेष्ठ कवी प्रकाश लावंड, प्राचार्य नागेश माने, सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव बंडगर, शिवरत्न ग्रामीण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अमरजित साळुंखे, सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य दिपक चव्हाण, नरेंद्रसिंह ठाकूर,           पत्रकार दिनेश मडके,नवनाथ मोहोळकर,नेमचंद भुजबळ,अशोक गोफणे,शहाजी मोहोळकर,कवीवर्य खलील शेख, एच.यु.जाधव,तात्यासाहेब ढाणे,संदिप मोटे, वीर सर,संतोष शितोळे सर,प्रकाश कोळेकर,  प्रशांत शिंदे,दिलीप शिरगिरे, बाळासाहेब टकले,डाॅ.शेळके,वाघमोडे सर,भास्कर पवार आदि मान्यवर उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

21 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

23 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

2 days ago