करमाळा प्रतिनिधी कोळगाव सब स्टेशन वरील जळालेला ट्रान्सफॉर्मर एका महिन्यात होणार कार्यान्वित. पुर्व भागातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या कोळगाव सब स्टेशन वरील ट्रान्सफॉर्मर जळाला असल्याने गत उन्हाळ्यात फक्त ४ तास विद्युत पुरवठा होत होता परीणामी शेतकर्यांचे अतोनात हाल व नुकसान झाले. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी पुर्व भागातील शेतकऱ्यांनी विकासप्रिय आमदार संजयमामा शिंदे यांना हिवरे येथील प्रवेशाच्या कार्यक्रमात विनंती केली असता आज सोलापूर येथे जिल्ह्याचे महावितरण चे मुख्य अधिक्षक अभियंता संतोष सांगळे यांच्या सोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला. एका महिन्यात ट्रान्सफॉर्मर चालू करू असे अधिक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी सांगितले. या प्रसंगी चोभे पिंपरी चे सरपंच विक्रम उरमोडे, तानाजी बापू झोळ, बाळासाहेब जगदाळे,भरत भाऊ अवताडे, मानसिंग भैय्या खंडागळे, माजी जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब निळ सर,हिवरे चे माजी सरपंच उमेश मगर, मिरगव्हण चे सरपंच पांडुरंग हाके, अर्जून नगर चे सरपंच प्रकाश थोरात, आबासाहेब सांडगे रामचंद्र पवार श्रीराम निळ आदी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…