मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्या वाढदिवसानिमित्त 12 जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी कारखान्याचे चेअरमन बागल गटाचे युवा नेते दिग्विजय प्रिन्स भैय्या बागल यांच्या वाढदिवसानिमित्त 12 जानेवारी रोजी सकाळी नऊ ते पाच या वेळेत भव्य रक्तदान शिबिर दत्त मंदिर विकासनगर करमाळा येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती बागल गटाचे कार्यकर्ते धनंजय ढेरे रवीभाऊ शेळके यांनी दिली आहे. या शिबिराचे उद्घघाटन उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल हिरेसाहेब, तहसीलदार समीर माने साहेब,करमाळयाचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणेसाहेब ,गटविकास अधिकारी मनोज राऊतसाहेब, यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील, नगरसेवक डॉ. अविनाश घोलप ,तालुका कृषी अधिकारी संजय काकडे साहेब डॉक्टर बाबुराव लावंड, यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून बागलगटाच्या स्वाभिमानी नेत्या सौ रश्मी दिदी बागल मार्गदर्शक विलासराव घुमरे सर, मकाईचे कारखान्याचे व्हाईस चेअरमन ॲड ज्ञानदेव देवकर, माजी व्हाईस चेअरमन बाळासाहेब पांढरे, आदिनाथ कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव बंडगर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती चिंतामणी दादा जगताप, शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकर काका लावंड, सीना कोळगाव धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश बापू निळ दूध संघाच्या संचालिका अलकाताई चौगुले, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आनंद कुमार ढेरे, मेजर ज्योतीराम लावंड, पोथरे चे माजी सरपंच हरिश्चंद्र झिंजाडे, नगरसेवक अल्ताफ शेठ तांबोळी, नगरसेवक सचिन घोलप, देवळालीचे माजी सरपंच संतोष गायकवाड, उद्योजक भरत शेठ खरात, नवनाथशेठ घरबुडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे कोरोना नियमावलीनुसार करून मास्क सोशल डिस्टन्सचे पालन करुन या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदवुन रक्तदानासारख्या या महान कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन बागल गटाचे कार्यकर्ते धनंजय ढेरे रवीभाऊ शेळके यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

5 hours ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago