मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद

 

करमाळा प्रतिनिधी श्री मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्या वाढदिवसानिमित्त दादाश्री फाउंडेशन आणि मकाई कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या रक्तदान शिबीरास 175 रक्तदातांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदवला. कोरोना काळात असणारी रक्ताची कमतरता लक्षात घेत हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
या रक्तदान शिबिरामध्ये बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी स्वतः रक्तदान करीत आपला सहभाग नोंदवला. या रक्तदान शिबीराला रक्तदातांनी आपला सहभाग नोंदवत मोठ्या प्रमाणात उस्फुर्त सहभाग नोंदवला आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने १०३० विविध वृक्षाचे वृक्षारोपण ही करण्यात आले. यासोबतच ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक्टरला रिफ्लेक्टर बसवण्यात आले. मकाई कारखाना आणि दादा फाउंडेशनच्या कार्यक्रम ही संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल, बाजार समितीचे सभापती शिवाजी बंडगर, यशकल्याणी सामाजिक संस्थेचे गणेश करे, कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन बाळासाहेब पांढरे, संचालक रामभाऊ हाके, महादेव गुंजाळ, संतोष देशमुख, दत्तात्रय गायकवाड, बापूराव कदम, नंदकिशोर भोसले, महादेव सरडे, आनंद ढेरे, शहाजी माने, दादाश्री फाउंडेशनचे दत्ता काकडे, माधव जाधव, कार्यकारी संचालक हरिश खाटमोडे, माजी संचालक मोहन गुळवे, सुनिल तानवडे, गणेश झोळ, रेवणनाथ निकत, साधना खरात यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.

” दादाश्री फाउंडेशन आणि मकाई कारखान्याने या कोरोनाच्या काळात घेतलेले रक्तदान शिबीर सामाजिक जाण देणारे आहे. यासोबतच त्यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला. आपण स्वतः रक्तदान करुन यामध्ये सहभाग नोंदवला. वाढदिवसाचे निमित्त असले तरी झालेला हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे.
— रश्मी बागल, बागल गटाच्या नेत्या

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

5 hours ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago