Categories: करमाळा

पश्चिम भागाचे युवक नेते ॲड अजित विघ्ने यांचा उद्या संजयमामा शिंदे गटात प्रवेश

करमाळा प्रतिनिधी
करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी पश्चिम भागातील सोडविलेला डिकसळ पुलाचा महत्वाचा प्रश्न व इतर विकास प्रिय मुद्द्यावर प्रभावित होऊन पश्चिम भागाचे नेते अॕड अजित विघ्ने येत्या शुक्रवारी आमदार संजय मामा गटात प्रवेश करणार आहेत.करमाळा तालुक्याच्या  पश्चिम भागातील अभ्यासू आणि जाणकार नेतृत्व, करमाळा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॕड. अजित विघ्ने यांचा शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता नगोर्ली फार्म हाऊस येथे आमदार संजय मामा शिंदे यांचे गटात जाहीर प्रवेश होणार आहे.अॕड अजित विघ्ने हे केत्तुर गावचे माजी सरपंच असून त्यांनी विविध शासकीय कमिटीवर काम केले आहे. सन 2012 साली त्यांनी जगताप गटाकडून पंचायत समितीची निवडणुक ही लढवली होती, शिवसेना नेते शिवाजीराव मांगले, माजी मंत्री दिंगबरराव बागल, माजी आमदार जयवंतराव जगताप, यांचेबरोबरही त्यांनी काम केले आहे. ॲड अजित विघ्ने सध्या माजी आमदार नारायण पाटील पटाची सक्रिय कार्यकर्ते असून जिल्हा परिषद पंचायत समिती करता प्रबळ दावेदार आहेत तसेच अतिशय प्रभावी युवक नेते असून आमदार संजय मामा शिंदे यांनी पश्‍चिम भागातील सोडवलेल्या डिळसळ पुलाचा महत्त्वाचा प्रश्न व इतर विकासप्रिय मुद्द्यावर प्रभावित होऊन आमदार संजय मामा शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

17 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

20 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

22 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago