करमाळा प्रतिनिधी श्री.चिंतामण दादा जगताप यांच्या खाजगी फिर्यादेची न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग 1 करमाळा श्री.प्रशांत घोङके यांनी घेतली गंभीर दखल !
चिंतामणी दादा जगताप यांनी 2020 साला मध्ये करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी यांचा मनमानी कारभार , फसवणुक व खोटी कागद पत्रे तयार करून बाजार समीतीचे नुकसान केले बाबत न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग 1 करमाळा श्री.प्रशांत घोङके यांच्या कङे दाद मागितली होती याबाबत हकिकत अशी की , दि. 8 जुलै 2019 रोजी न्याय प्रविष्ट विषय असताना व राजकीय निदर्शनात बाजार समिती चे सर्व कर्मचारी यांनी हिरिरीने ” भाग घेवुन ” बाजार समिती कर्मचारी सेवा , शर्त व नियम ” यांचा सपशेल भंग केला आहे . ऐवढेच नव्हे तर तत्कालीन सचिव व फिर्यादेनुसार मुख्य आरोपी तथा सूत्रधार सुनिल नामदेवरावजी शिंदे रा. करमाळा / कोर्टी याने सदरच्या कारणांन साठी बाजार समिती आज बंद असल्या बाबत कार्यालयाच्या मुख्य द्वारा वरती लिखीत फलक ङकवला होता अशी नोंद सहायक निबंधक यांच्या कङे नोंदवले आहे . तसेच स्वतहा प्रत्यक्ष व इतर कर्मचार्यांना घेवुन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदने देवुन विवीध पत्रकारांना प्रेस नोट दिल्या. हा मस्तवालपणा शिंदे व इतर कर्मचाऱ्यावर अंगलट येताना दिसत आहे !
त्याच बरोबर बहुतांश कर्मचारी वाटेल तेंव्हा कार्यालयात ये-जा करीत वाटेल तेंव्हा रजेचा अर्ज न देता सभापतींन च्या परवानगीशिवाय पुणे , मुंबई व सोलापूर येथे कोर्ट कचेरी कामाच्या निम्मीताने काम काजाच्या वेळेत पै-पाहुण्यांन कङे सेरसपाटा मारत असतात . 2-2 , 5-5 ते 10-10 दिवस कामावरती हजर न राहता व एकाच वेळी सर्व सह्या हजेरी पुस्तकात करून संगनमताने खोटे दस्त तयार करून पगारी उचल्या आहेत, सदरच्या सर्व पुराव्यांची कागद पत्रे श्री.चिंतामणी दादा जगताप यांनी कोर्टात दाखल केली होती . या विषयी कोर्टाने गंभीर दखल घेत दि 12 जानेवारी 2022 रोजी श्री. जगताप यांचा अर्ज मंजुर करीत निशाणी 1 वर आदेश पारित केले व फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 202 प्रमाणे करमाळा ठाणे पोलीस निरीक्षक श्री.कोकणे यांना तत्काल अहवाल सादर करण्या बाबत आदेश दिले आहेत, चिंतामणी दादा जगताप यांच्या वतीनेॲड जयदीप देवकर यांनी बाजु मांङली व सहाय्यक कालीदास बिचीतकर यांनी काम पाहीले .
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…