करमाळा प्रतिनिधी. करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आघाडी करण्याचे प्रस्ताव आहेत मात्र ऐनवेळी आघाडी नाही झाली तरी जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊन बागल गटाकडून पूर्ण ताकतीनिशी नगरपालिका निवडणूक लढवणार असल्याचे मत बागल गटाचे नेते व माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की करमाळा शहर म्हणजे एक सुधारित खेडे असल्यासारखी शहराची अवस्था असून विकासाच्या केवळ गप्पा मारल्या जात आहेत. शहरातील अंतर्गत गटारी व रस्ते यावरून विकास झाला असे म्हणता येणार नाही तो रुटीन कामाचा भाग आहे. खरंच काय शहराची हद्द वाढ होणे गरजेचे असुन शहराच्या अवतीभवती राहणाऱ्या नागरिकांना भौतिक सुविधा मिळाल्या पाहिजे. याप्रसंगी बोलताना आगामी निवडणूक धनुष्य घेऊन लढवणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मी आज देखील शिवसेनेत असल्याचे त्यांनी सांगित.ले मात्र शहरातील भागातील मतदारांची मानसिकता आणि पक्षाबाबत वेगळी असू शकते त्यामुळे परिस्थिती पाहून निर्णय घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले तसेच आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत बागल पाटील ठरली असल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे यामध्ये तथ्य आहे का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सध्या कोणती याचा बोलणे झाले नसून ज्या त्या वेळेस निर्माण होणाऱ्या परिस्थितीनुसार समीकरणे घडतील युतीबाबत संभ्रम कायम ठेवला आहे .पत्रकार परिषदेत बागल यांनी जगताप यांना करमाळा नगरपरिषद निवडणुकीसाठी थेट आव्हान दिले आहे या पत्रकार परिषदेला अध्यक्ष महेश चिवटे, सचिव नासीर कबीर , अशोक नरसाळे, दिनेश मडके, आशपाक सय्यद, संजय शिंदे, संजय चौगुले, विशाल घोलप, अशोक मुरूमकर,नाना पठाडे, समाधान फरतडे, अविनाश जोशी, धर्मराज दळवी,उमेश पवळ, नागेश चेंडगे सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…