करमाळा प्रतिनिधी. विश्वासार्हता गमावलेल्या बागलांच्या तोंडी आव्हानाची भाषा शोभत नाही, मांगीतील तुंबलेल्या गटारींकडे अगोदर लक्ष द्या, शहरवासियांचा जगताप गटावरच ठाम विश्वास हे गेली २५ वर्षाच्या कामकाजावरून झाले आहे सिद्ध झाले आहे असे मत जगताप गटाचे युवा नेते नगराध्यक्ष वैभव आबा जगताप यांनी व्यक्त केले आहे आदिनाथ व मकाई कारखान्यांच्या कारभारातून अमाप भ्रष्टाचार करून बागलांनी तालुक्यातील शेतकरी व कामगारांचे प्रपंच उद्धवस्त केले . त्याचे भोग तालुक्यातील जनता आजही भोगत आहे . बागलांनी काठावर ताब्यात आलेल्या मांगी ग्रामपंचायतीमधील गटारी तुंबून तेथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे अगोदर त्याकडे लक्ष द्यावे, बागलांच्या मांगीतील कारभाराला ग्रामस्थ कंटाळल्यामुळेच निम्मे मतदान विरोधात जावून जाता -जाता ग्रामपंचायत राहिले त्यांनी त्याची काळजी करावी .शहरातील जनता सुजाण असल्यामुळे बागलांचे कोणतेही वक्तव्य गांभीर्याने घेत नाही असे मत जगताप गटाचे युवानेते नगराध्यक्ष वैभव आबा जगताप यांनी व्यक्त केले आहे.करमाळा शहरातील जनतेचा जगताप गटाने केलेल्या विकासकामांवर ठाम विश्वास असल्यामुळेच जनतेने गेली २५ वर्षे जगताप गटाच्या ताब्यात सत्ता दिली आहे . नगरपालिकेस स्वच्छता अभियाना मधे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत . अखंड स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज व अन्य सोयी सुविधा दिल्या मुळेच शहरवासियांचा जगताप गटाच्या कामकाजावर पूर्ण विश्वास आहे . कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून शहरात विकासकामांचा डोंगर उभा केलेला आहे . बागल यांनी दिलेले आव्हान म्हणजे गट टिकविणे साठी उसने अवसाण आणण्याचा प्रकार आहे . बागलांना २० उमेदवारांपैकी ४ उमेदवार उभे करता आले तरी पुष्कळ अशी त्यांच्या गटाची दयनीय अवस्था आहे त्यामुळे त्यांच्या तोंडी आव्हानाची भाषा म्हणजे हास्यास्पद विनोद असल्याची टीका जगताप यांनी केली आहे .
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…