करमाळा प्रतिनिधी श्री मकाई सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना असून हा कारखाना सुरू करण्यासाठी आपण आपली प्रॉपर्टी गहाण ठेवून कारखाना चालू केला असल्याचे मत श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी पत्रकारदिनानिमित्त सत्कार कार्यक्रम प्रसंगी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. स्व. दिगंबरराव बागल मामा यांच्या सर्वसामान्य जनतेच्या लोककल्याण करण्याच्या विचारांचा वारसा जपत शेतकरी ,ऊसतोड कामगार, कारखान्याचे कर्मचारी यांचे प्रपंच व्यवस्थित चालले पाहिजे याकरता मकाई कारखाना सुरू होणे गरजेचे होते अशा परिस्थितीमध्ये कोणतीही बँक कारखान्यावर कर्ज देण्यास तयार नव्हती अशा परिस्थितीमध्येमध्ये आपली मालमत्ता गहाण ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता इतर लोकांचे खाजगी कारखाने असल्याने ते प्रॉपर्टी गहाण ठेवून कारखाने चालू शकतात परंतु सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या मालकीचा असताना त्याकरिता जनतेच्या कल्याणासाठी हे आपण काम केले असून याबाबत आतापर्यंत कुणापुढे प्रसिध्दी केली नाही. जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने सर्वसामान्य जनता शेतकऱ्याचे हित जपल्यामुळे स्वाभीमानी नेत्या रश्मी दिदी बागल मार्गदर्शक विलासराव घुमरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मकाई सहकारी कारखाना व्यवस्थित गाळप करत असून साडेबाराशे टन क्षमता असताना दुप्पट क्षमतेने कारखाना चालू आहे. करमाळा तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढले असून खाजगी कारखान्याबरोबरच मकाई पूर्ण क्षमतेने चालून सुद्धा आदिनाथ कारखाना चालू होणे गरजेचे होते परंतु बँकेने याबाबत ठोस भूमिका घेणे गरजेचे गरजेचे आहे. आदिनाथ कारखान्याबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी माजी आमदार जयवंतराव जगताप व आमदार संजय शिंदे यांनी निवडणूक लागल्यास आम्ही निवडणुकीत उतरणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पुढच्यावर्षी आदिनाथ सुरु करण्याबाबतही अशा व्यक्त केली आहे.बागल म्हणाले, आदिनाथ कारखाना सुरळीतपणे सुरु रहावा म्हणून संचालक मंडळाने मते व्यक्त केल्यानंतरच भाडे तत्वावर देण्याचा निर्णय घेतला होता. त्यातून शेतकऱ्यांचे हित पहिले होते. याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती. शिवसेनेच्या प्रमुखांच्या कानावरही हा विषय घेतला होता. त्यानंतरच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत हा कारखाना पवार यांच्या बारामती ॲग्रोला देण्याचा निर्णय झाला. मात्र त्यानंतर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. सध्या कारखाना एमएससी बँकेच्या ताब्यात आहे. त्यांनीच हा कारखाना त्वरित हँडव्होर करावा. त्याशिवाय कारखाना पुढच्यावर्षी सुरु होऊ शकत नाही, मात्र त्यावरमार्ग निघून कारखाना सुरु होईल असा विश्वासही त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. आगामी नगरपालिका निवडणूक समविचारी पक्षांना एकत्र येऊन लढवणार असुन जे लोक आमच्यावर येतील त्यांना बरोबर घेऊन आम्ही निवडणूक लढवणार आहे. सत्ताधारी जगताप यांनी करमाळा शहरात विकासाच्यादृष्टीने कुठलेच काम केले नाही शहरातील गटारी,रस्ते याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असुन नागरिकांमध्ये याबाबत प्रंचड नाराजी असुन जनता नक्कीच बदल करणार असल्याने बागल गट सर्वांना बरोबर घेऊन निवडणूक लढवणार आहे परिवर्तनाच्या लढाईमध्ये जे लोक सहभागी होतील त्यांना बरोबर घेऊन अन्यथा त्यांच्याशिवाय बागलगट पूर्ण ताकदीनिशी नगरपालिकेची निवडणुक लढवणार आहे. करमाळा नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीसाठी बागल गट नारायण पाटील गट यामध्ये युती होणार का असा प्रश्न केल्यानंतर दिग्विजय बागल याबाबत निर्णय बागल गटाच्या स्वाभिमानी नेत्या रश्मी दिदी बागल मार्गदर्शक विलासराव घुमरे सर यांच्या विचाराने कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष महेश चिवटे, सचिव नासीर कबीर , अशोक नरसाळे, दिनेश मडके, आशपाक सय्यद, संजय शिंदे, संजय चौगुले, विशाल घोलप, अशोक मुरूमकर,नाना पठाडे, समाधान फरतडे, अविनाश जोशी, धर्मराज दळवी,उमेश पवळ, नागेश चेंडगे दस्तगिर मुजावर सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…