करमाळा प्रतिनिधी आमदार संजयमामा शिंदे गटात होत असलेल्या प्रवेशाचा धसका घेऊन काही विघ्नसंतोषी लोकांकडून माझ्याबद्दल अफवा पसरवण्याचे काम सुरू आहे या तर्कवितर्कांना अफवांना कोणीही बळी पडू नये मी आमदार संजय मामा शिंदे यांच्या गटात असून पुन्हा आमदार करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे असा खुलासा चिखलठाणचे विद्यमान सरपंच बाजार समितीचे संचालक चंद्रकांत काका सरडे यांनी केला आहे. याबाबत पुढे बोलताना चंद्रकांत काका म्हणाले की करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची मीटिंग असल्याने मी त्या ठिकाणी उपस्थित होतो.मीटिंग संपल्यानंतर माझे सहकारी संचालक चिंतामणी जगताप यांचे अपात्र ठरलेले संचालक पद सहकार आयुक्तांनी पुढील आदेश येईपर्यंत कायम ठेवल्याबद्दल त्यांचा मार्केट कमिटीच्यावतीने सत्कार करण्यात आला.यावेळी मी संचालक या नात्याने उपस्थित होतो परंतु दैनिक वृत्तपत्रावर आलेली बातमी कोणीही तर्कवितर्क करून माझी बदनामी करू नये मी करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे याचा एकनिष्ठ कट्टर समर्थक आहे मी कालच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या तालुक्यातील काही विघ्नसंतोषी लोकांकडून अफवा पसरवण्याचे काम चालू आहे. मी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगाने कोणत्याही गटात जाणार नाही मी संजयमामा शिंदे गटात एकनिष्ठ आहे. माझ्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना विनंती आहे कि कोणीही तर्कवितर्क लावू नये मी आमदार संजय मामा शिंदे गटात आहे आणि या गटात शेवटपर्यंत राहणार असल्याचे चंद्रकांत काका म्हणाले यांनी सांगितले.
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…