करमाळा प्रतिनिधी
करमाळा मतदारसंघांमध्ये जिल्हा हद्द कोर्टी विहाळ वीट करमाळा पांडे सालसे आवाटी ते उस्मानाबाद जिल्हा हद्द या रस्त्याचे काम एन. पी. इन्फ्रा प्रो. प्रा. लिमिटेड पुणे या कंपनीच्या माध्यमातून अशियाई विकास बँक च्या अर्थसहाय्यातून सुरू आहे .या कंपनीच्या डांबर प्लांट चे उद्घाटन उद्या आ. संजयमामा शिंदे ( विधानसभा सदस्य करमाळा- माढा). यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आ. जयवंतराव जगताप
हे असणार आहेत .यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री निरंजन तेलंग. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग ,अकलूज. तसेच
मा. श्री नितीन तापडिया (कार्यकारी संचालक एन पी इन्फ्रा पुणे , तहसीलदार समीर माने, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे उपस्थित राहणार असून सदर कार्यक्रम शेलगाव क ( सौंदे – गुळसडी रोड ) येथे 10:30. वाजता होणार आहे.उद्या दुपारी 11:30 वाजता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत मौजे कोळगाव येथे 3.15 MVA नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे या कामाचे उद्घाटन आ. संजयमामा शिंदे ( विधानसभा सदस्य करमाळा- माढा). यांच्या शुभहस्ते होत असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. जयवंतराव जगताप हे असणार आहेत तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून मा. संतोष सांगळे. ( अधीक्षक अभियंता म.रा.वि.वि.क सोलापूर ) मा. सुरेश कुऱ्हाडे.( कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.क विभागीय कार्यालय बार्शी ). हे उपस्थित राहणार आहेत सदर कार्यक्रम कोळगाव सबस्टेशन या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन एन.पी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड पुणे, सार्वजनिक बांधकाम उपविभाग कारमाळा, ग्रामपंचायत शेलगाव क, सौंदे,महावितरण उपविभाग जेऊर , ग्रामपंचायत कोळगाव , मिरगव्हण, अर्जुननगर, फिसरे ,हिसरे ,आवाटी, हिवरे, गौंडरे, निमगाव यांच्यावतीने करण्यात आले आहे.