करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचे विकासप्रिय आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा तालुक्यातील 2017 पासून बंद असलेल्या कोळगाव सबस्टेशन मधील 3:15 नवीन ट्रान्सफर बसवून त्याचे उद्घघाटन माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली करून या भागातील शेतकऱ्याचा विजेचा प्रश्न सोडवल्यामुळे संजयमामा गटात प्रवेश केल्याचे सार्थक झाल्याचे मत संजयमामा समर्थक फिसरे गावचे उद्योजक युवक नेते भरतभाऊ आवताडे यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की गेल्या दोन वर्षापासून कोळगावचा ट्रांसफार्मर बंद असल्यामुळे येथील शेतकऱ्यांना चार तास वीज मिळत होती त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. ही बाब आम्ही संजयमामा शिंदे यांच्या निदर्शनास आणून ही मागणी केली होती.याबाबत दखल घेऊन आमदार संजयमामा शिंदे यांनी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन अवघ्या अठरा दिवसांमध्ये शेतकऱ्याचा विजेचा प्रश्न सोडवल्यामुळे येथे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून या भागातील सिंचनाचे क्षेत्र वाढणार असून शेतकऱ्याचा प्रपंच सुखी व समाधानी होण्यास मदत होणार असून आमदार संजय मामा शिंदे यांनी आम्हाला दिलेला शब्द पाळुन शेतकऱ्यांचे हित जपल्यामुळे येथील जनता संजयमामा शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. आपण संजय मामा शिंदे यांच्या गटात गेल्याचे खऱ्या अर्थाने सार्थक झाले आहे करमाळा तालुक्यातील जनता गटातटाच्या राजकारणाला कंटाळली असून आगामी काळात संपूर्ण करमाळा तालुका संजयमामा शिंदे यांच्या विकासाच्या राजकारणाला प्राधान्य देणार असून संजय मामा शिंदे यांच्या विकासाच्या राजकारणात आपण सहभागी होणार असून संजय मामा शिंदे गटामध्ये राहुन सर्वसामान्य जनता शेतकरी हित जपण्याचे कार्य करणार असल्याचे उद्योजक युवक नेते भरतभाऊ आवताडे यांनी सांगितले आहे.
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…