Categories: करमाळा

आ. संजयमामा शिंदे यांच्या हस्ते शेलगाव क येथील डांबर प्लांट चे उद्घाटन … माजी आ. जयवंतराव जगताप यांची प्रमुख उपस्थिती…

करमाळा प्रतिनिधी
करमाळा मतदारसंघांमध्ये जिल्हा हद्द कोर्टी विहाळ वीट करमाळा पांडे सालसे आवाटी ते उस्मानाबाद जिल्हा हद्द या रस्त्याचे काम एन. पी. इन्फ्रा प्रो. प्रा. लिमिटेड पुणे या कंपनीच्या माध्यमातून अशियाई विकास बँक च्या अर्थसहाय्यातून सुरू आहे .या कंपनीच्या डांबर प्लांट चे उद्घाटन आज सकाळी 11 वा. आ. संजयमामा शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आ. जयवंतराव जगताप हे होते.
डांबर प्लांट च्या उद्घाटनप्रसंगी आमदार शिंदे म्हणाले की, दौंड काष्टी बार्शी उस्मानाबाद रामा. 68 या रस्त्यात करमाळा तालुक्यातील जिल्हा हद्द कोर्टी ते जिल्हा हद्द आवाटी इथपर्यंत 50.54 कि.मी चा भाग येतो. यामध्ये जवळपास 10 कि.मी लांबीचा रस्ता वन विभाग व माळढोक अभयारण्यातून जात असल्यामुळे सदर रस्त्याच्या कामासाठी अडचण येत आहे. या अडचणींमध्ये आपण लक्ष घातले असून मा. जिल्हाधिकारी यांना वनविभागास पर्यायी वनेतर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी आपण पत्र दिले असून हुलगेवाडी येथील गट नंबर 2 मधील गायरान जमीन देण्यासाठी नाहरकत प्रस्ताव दिलेला आहे. सदर रस्ता वेळेत पूर्ण करण्यावर व दर्जेदार काम करण्यावर एन. पी इन्फ्रा कंपनीने लक्ष द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूजचे कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग, उप अभियंता उबाळे, कंपनीचे कार्यकारी संचालक नितीन तापडिया ,माजी जिप सदस्य उद्धव दादा माळी, वामनदादा बदे ,तानाजी झोळ,चंद्रहास निमगिरे, रामचंद्र काटूळे ,दत्ता जाधव ,भास्कर भांगे, मानसिंग खंडागळे, भरत अवताडे, सुजित बागल, विवेक येवले, सरपंच अशोक काटू ळे, बाळासाहेब जगताप, सौंदेचे सरपंच गायकवाड, उपसरपंच उमेश वीर, उपसरपंच सचिन वीर , राजेंद्र पवार तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर विकास वीर यांनी केले तर आभार अशोक भांडवलकर यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

11 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

1 day ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

1 day ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago