करमाळा प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गजानन सोशल स्पोर्ट्स क्लब यंदाच्या वर्षी गणेश जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे अशी माहिती गजानन सोशल ॲन्ड स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी दिली आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन भाविक भक्तांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून यावर्षी होम हवन पूजा करून गणेश जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे करमाळा शहरातील भाविक भक्तांनी याची नोंद घेऊन गणेश जयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. गजानन सोशल ॲन्ड स्पोर्ट्स क्लब दरवर्षी गणेश जयंती उत्सव शहरातील वेताळपेठ येथे मोठ्या प्रमाणात साजरा करून संपूर्ण करमाळा शहरातील नागरिकांना महाप्रसाद दिला जातो या उत्सवात सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घेऊन गुण्यागोविंदाने या उत्सवात सहभागी होतात. मात्र यंदाच्यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने गजानन सोशल ॲन्ड स्पोर्ट्स क्लबच्या सर्व सदस्यांनी मिळुन एकमताने हा निर्णय घेतला असून प्रशासनाने दिलेल्या नियम अटीचे पालन करून गणेश जयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार असल्याचे प्रशांत ढाळे यांनी सांगितले आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…