–
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरात गेली २५ वर्षापासून सातत्त्याने अखंडीत, सुरळीत सुरु असलेला पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य यासह कोट्यावधी रुपयांची केलेली विकासकामे शहरवासियांचा माजी आमदार जगताप यांचे नेत्तृत्वावर असलेला गाढा विश्वास, श्रद्धा व नागरीकांना दिलेल्या सोयीसुविधांमुळे येणाऱ्या नगरपरीषद निवडणुकीत जगताप गटाचा विजय निश्चित असल्याचा ठाम आत्मविश्वास माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी व्यक्त केला आहे . याविषयी अधिक माहिती देताना ढाळे यांनी सांगीतले कि,
करमाळा नगर परीषद १९९५ सालापासुन मा .आ .जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली जगताप गटाच्या सलग २५ वर्ष ताब्यात आहे .’ क’ वर्ग नगर परीषद असताना देखील जयवंतराव जगताप यांनी अपक्ष आमदार असताना खास बाब म्हणून उजनी जलाशयावरून दहिगाव येथुन करमाळा शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर करून ती कार्यान्वित केली .२००९ मधे शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार याचा विचार करून १३ कोटीची विस्तारीत पाणी पुरवठा योजना देखील मंजूर करून कार्यान्वित केली . याचा परिणाम म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना , लातूरला रेल्वे व्दारे पाणीपुरवठा होत असताना , सोलापूर व अक्कलकोट सारख्या ठिकाणी १५ – १५ दिवस पाणी येत नव्हते परंतु करमाळा शहरात मात्र अखंडीत , स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा अव्याहतपणे सुरू होता व आहे . त्याचबरोबर शहरातील रस्ते, वीज, आरोग्य, स्वच्छता या बाबी अतिशय सुरळीत असल्यामुळे शहरवासियांची जयवंतरावांच्या नेतृत्वावर अगाढ श्रध्दा व ठाम विश्वास आहे .आगामी काळात शहरात भुयारी गटार योजनेस मंजुरी व निधीची उपलब्धता करून लवकरात लवकर ही योजना पूर्णत्वास नेण्याचा जयवंतराव जगताप यांचा मानस आहे . आमदार संजयमामा शिंदे यांचेसमवेत भुयारी गटार योजना व रस्ते निधी संदर्भात चर्चा होवून त्याचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच या योजनांना मंजूरी व निधीची उपलब्धता निश्चितपणे होणार असल्याची माहिती देखील आमदार शिंदे व माजी आमदार जगताप यांनी दिली आहे .
जगताप गटाला करमाळा तालुक्यात कार्यकर्ते व नेते घडविणारी नर्सरी असे संबोधले जाते .जयवंतराव जगताप यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही . बहुसंख्य समाजासह अल्पसंख्य समाजासही त्यांनी राजकारणात न्याय दिला .करमाळा नगर परीषदेच्या नगराध्यक्षपदी त्यांनी युसूफ नालबंद, ॲड .डी.पी. जगताप, सुशीला आगलावे, शौकत नालबंद, सुनीता वाशिंबेकर, विद्या चिवटे, पुष्पा फंड, अमोद संचेती, दिपक ओहोळ,ज्ञानेश्वर मोरे, वैभव जगताप आदींना संधी दिली . तर उपनगराध्यक्ष पदी माझे सह हनिफ कुरेशी , दादासाहेब सावंत, ॲड . कमलाकर वीर, राजकुमार परदेशी, अहमद कुरेशी , रतनचंद दोशी, श्रीनिवास कांबळे, सत्यभामा बनसुडे आदींना संधी दिली . तसेच अजितसिंग परदेशी , नजीर अहमद कुरेशी, भारत जाधव, गुलाम हुसेन वस्ताद, दादाराम लोंढे, बबन पाटील, ज्ञानदेव फंड, इंदूरे, रासकर, चांदगुडे, मंडलिक, घोलप, फंड, राखुंडे,कुंभार, क्षीरसागर, ढेपे, कांबळे,बनसुडे , आवटे ,यांचे सह अनेक कार्यकर्त्यांना नगरसेवकपदी काम करणेची संधी दिली . जयवंतराव जगताप यांचे खंबीर नेतृत्त्व असले मुळे शहरात कधीही दहशत, जातीयवाद आदी बाबींना थारा मिळाला नाही व शहराचे सामाजीक स्वास्थ्य उत्तमरित्या टिकून राहिले आहे . सर्व जाती – धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत . शहरात जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली बाजार समिती चा सर्वांगीण विकास झाल्यामुळे त्याच्या सकारात्मक परिणामातून सक्षम बाजारपेठ निर्माण होवून अर्थकारणास चालणा मिळाली . शहरात सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या . माजी आ .जगताप यांनी शहरातील शेकडो युवकांना विविध संस्थांमधे नोकरीच्या संधी दिल्या . नोकरी व व्यवसायाच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना उदरनिर्वाहाची संधी दिली .त्यामुळे शहरातील प्रत्येक कुटुंबामधे जगताप यांचे विषयी कृतार्थतेची व आदराची भावना असून सर्वसामान्य जनतेचे अपार प्रेम लाभलेले जयवंतराव जगताप हे तालुक्यातील एकमेव नेतृत्त्व असल्याचे देखील माजी नगराध्यक्ष ढाळे यांनी सांगीतले .
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या धकाधकीच्या युगामध्ये पत्रकारानी आरोग्याची काळजी घेऊन वेळोवेळी तपासणी करून तणाव मुक्त…
करमाळा प्रतिनिधी लोकमंगल सहकारी पतसंस्थेने नागरिकांचे हित जपले असून पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना राबवुन पत्रकारांना…
करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपरिषदेच्या. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दहिगाव सबस्टेशन वर नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार’ आणि ‘पोलीस एकाच नाण्याच्या दोन बाजू असून लोकशाही टिकवण्यासाठी पत्रकारांना पाठबळ द्यावे…
मुंबई /प्रतिनिधी देशभरातील माध्यमांतील पत्रकार व संपादक यांच्या न्याय हक्कांसाठी संपादक व जेष्ठ माध्यम तज्ञ…
करमाळा, प्रतिनिधी - राज्यभर व्याप्ती असलेल्या युवा भिम सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने दिला जाणारा…