यशवंत परिवारासाठी आधारवड असलेले व्यक्तिमत्व – विलासराव घुमरे सर तरुण, तडफदार आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व या वर्णनपर शब्दांवर ज्या व्यक्तिमत्त्वाचा अधिकार आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे विद्या विकास मंडळाचे आदरणीय विलासराव घुमरे सर! आज 68 व्या वर्षांमध्ये ते पदार्पण करत आहेत. तरी देखील त्यांच्यामध्ये तरुणाला लाजवेल असा उत्साह, राहणीमानातील नीटनेटकेपणा आणि हजरजबाबी संवाद कौशल्यातून अनुभवास येणारे त्यांचे व्यक्तिमत्व सोलापूर जिल्ह्यातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि कृषी व औद्योगिक क्षेत्रावर आपला प्रभाव टिकून आहे हे विशेष! कारण हे वय निवृत्तीचे, मात्र निरलसवृती असलेले घुमरे सर ‘विद्या विकास मंडळ’ या संस्थेच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत.
याशिवाय ते प्रगतशील शेतकरी, यशस्वी उद्योजक आणि राजनीतीकुशल मार्गदर्शक या भूमिकाही आपल्या बौद्धिक सामर्थ्याच्या आणि जीवन अनुभवाच्या आधारे वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने पार पाडत आहेत. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील आजी- माजी विद्यार्थी आणि शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ते आधारवड आहेत.
संस्थेतील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या जीवनातील लहान- मोठ्या सुख दुःखाप्रसंगी त्यांच्या पाठीशी आत्मीयतेने ते उभे असतात. विद्यार्थ्यांच्या परिस्थितीचा सर्वांगीण दृष्टीने विचार करून त्यांच्या परिपूर्ण विकासासाठी ते सतत प्रयत्न करतात.
आज महाविद्यालयाच्या मार्गावर दत्त मंदिरापासून दुतर्फी उभी असलेली झाडे, महाविद्यालयाचे प्रशस्त क्रीडांगण, अत्याधुनिक जिम्नॅशियम, भव्य असा शूटिंग रेंज हॉल, ग्रंथालय, विद्यार्थिनींसाठी विशेष सोयी-सुविधा, नव्याने सुरू झालेल्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज प्रयोगशाळा हे सारे उपलब्ध असण्यामागे त्यांची दूरदृष्टी आणि प्रेरणा आहे.
करमाळा तालुक्यातील सर्व जाती- धर्माचे विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले पाहिजेत. या त्यांच्या अभ्यासातूनच महाविद्यालयाची प्रगती होत आहे. मित्र जोडणे, मैत्री टिकवणे आणि मित्रावर मनापासून प्रेम करणे हा स्नेहश्री घुमरे सर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा दिमाखदार पैलू म्हणावा लागेल. शेती, उद्योग, शिक्षण, राजकारण, समाजकारण आणि इतर बहुविध क्षेत्रात वारंवार जीवापाड प्रेम करणारे मित्र आहेत.
राजकारण धुरंदर, राजकारणातील चाणक्य आणि किंगमेकर म्हणून सर सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रामध्ये ओळखले जातात. दिगंबररावजी बागल मामांच्या राजकीय जडणघडणीमध्ये सरांचे लक्षणीय योगदान होते. तसेच रश्मीदीदी बागल- कोलते यांचा करमाळा तालुक्यातील राजकीय व सहकार क्षेत्रात झालेला दमदार आणि नेत्रदीपक उदयामागेही सरांचे मार्गदर्शन होते हे सर्व मान्य आहे. आजही रश्मीदीदी आणि मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल प्रिन्स यांच्या राजकीय वाटचालीमध्ये सरांचे मार्गदर्शन असते.
जीवनामध्ये अनेक कडू-गोड अनुभव घेऊन समृध्द झालेले घुमरे सर कसोटीच्या प्रसंगातून तावून सुलाखून निघालेले घुमरे सर, स्वतःचे दुःख लपवून हसतमुखाने जीवनाला सामोरे जाणारे घुमरे सर, सार्वजनिक जीवनामध्ये जसे यशस्वी आणि समाधानी आहेत तसेच कौटुंबिक जीवनात ही सुखी आणि समाधानी आहेत. याचे संपूर्ण श्रेय सरांच्या पत्नी आदरणीय जयश्री विलासराव घुमरे यांचे आहे.
सरांचे दोन सुपुत्र ऍड. विक्रांत आणि उद्योजक आशुतोष हे यशस्वी उद्योजक आहेत. दोन मुले, सुना आणि नातवंडे यांच्या गोड सहवासात घुमरे सर आणि जया वहिनी सुखी, संपन्न आणि समृद्ध जीवनाचा अवीट आनंद घेत आहेत. किंबहुना पती, पिता, श्वशूर आणि आजोबा किती प्रेमळ, दिलखुलास, शिस्तप्रिय, बुद्धिमान, संवादकौशल्य आणि आदर्श असू शकतात याचा सुखद अनुभव घेणारे सरांच्या कुटुंब खरोखर भाग्यवान म्हटले पाहिजे. तेव्हा अशा अष्टपैलू घुमरे सरांचे प्रेम सदैव मिळावे. म्हणून त्यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो ही मनःपूर्वक सदिच्छा!
प्रा. प्रदीप मोहिते, करमाळा
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या धकाधकीच्या युगामध्ये पत्रकारानी आरोग्याची काळजी घेऊन वेळोवेळी तपासणी करून तणाव मुक्त…
करमाळा प्रतिनिधी लोकमंगल सहकारी पतसंस्थेने नागरिकांचे हित जपले असून पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना राबवुन पत्रकारांना…
करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपरिषदेच्या. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दहिगाव सबस्टेशन वर नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा…